शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कर्जतमध्येही प्रथमच होणार हळदीवर प्रक्रि या

By admin | Published: March 23, 2016 2:18 AM

तालुक्यात आजपर्यंत पारंपरिक भातशेतीच केली जात होती, परंतु काही तरुण शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रथमच हळदीची लागवड केली

विजय मांडे,  कर्जततालुक्यात आजपर्यंत पारंपरिक भातशेतीच केली जात होती, परंतु काही तरुण शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रथमच हळदीची लागवड केली आणि विशेष म्हणजे कमी जागेत हळदीचे भरघोस पीक घेत लाखोंचे उत्पन्न मिळविले.हळदीवर प्रक्रि या करणाऱ्यांसाठी आवश्यक बॉयलर मशिन उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील हळदीचे विक्र मी पीक घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्याला बॉयलर मशिनचे वाटप केले आहे. त्यामुळे तालुक्यातील हळदीचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना हळदीवर प्रक्रि या करण्यासाठी यापुढे तालुक्याबाहेर जावे लागणार नाही. रायगड जिल्हा कृषी विभाग आणि पंचायत समिती, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी तिवरे येथे तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे उद्घाटन आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती अरविंद म्हात्रे, जि. प. सदस्य सुदाम पेमारे, माजी अर्थ व बांधकाम सभापती पुंडलिक पाटील, माजी सभापती तानाजी चव्हाण, सभापती सुवर्णा बांगारे, उपसभापती मनोहर थोरवे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी बाळसाहेब पाटील, विनय वेखंडे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. लक्ष्मण चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मेळाव्यात कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतीचे महत्त्व पटवून देत फक्त भातशेतीवर अवलंबून न राहता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत पिके घ्यावी किंवा शेतीला पूरक व्यवसाय करावा, असे आवाहन करीत त्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. यामध्ये कृत्रिमरीत्या मधनिर्मिती, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आदीबाबत वैशाली सावंत यांनी माहिती दिली.