चारा उत्पादनासाठी गाळपेराची जमीन भाडेपट्ट्यावर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:39 AM2018-12-15T00:39:40+5:302018-12-15T00:39:50+5:30
जिल्हा प्रशासनाचा पुढाकार; शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपया भाडे आकारणी
अलिबाग : राज्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे जनावरांच्या चारा उत्पादनावर परिणाम झाला आहे. येत्या काळात चाराटंचाई होऊ नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत चारा उत्पादन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील जलसंपदा, मृद व जलसंधारण या विभागांकडील जलप्रकल्पांमधील उपलब्ध गाळपेर जमिनी शेतकºयांना नाममात्र एक रु पये दराने भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्याचे पर्जन्यमान राज्यातील इतर भागांपेक्षा चांगले असले तरी शेतकºयांनी उत्पादित केलेला चारा हा केवळ त्यांच्या स्वत:च्या पशुधनाकरिताच वापरता येईल इतका आहे. स्वत:च्या पशुधनाच्या चाºयाची गरजपूर्ती होऊन अन्य शेतकरी, दूध उत्पादकांना माफक दरात चारा उपलब्ध करून द्यावयाचा आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होऊन बुडिताखालील उघड्या गाळपेर जमिनींवर चारा पिकाची लागवड करून चारा उत्पादन करणे हा पर्याय आहे. त्यासाठी इच्छुक शेतकºयांना चारा उत्पादनासाठी या जमिनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नाममात्र एक रुपये दराने भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहेत.
पशुधनाच्या चारा उत्पादनासाठी जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवी संस्था, गोरक्षण संस्था, तसेच अन्य शेतकरी (ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था उपलब्ध आहे) अशांनाही विनामूल्य बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिवाय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अधिपत्याखालील रोपवाटिका, फळबाग जमिनी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाकडील लघुसिंचन तलावाचे गाळपेर क्षेत्र येथेही चारा उत्पादनासाठी मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा व राज्यातील टंचाईग्रस्त भागातील जनावरांसाठीही चारा उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेचा लाभासाठी शेतकºयांनी पंचायत समित्यांमधील पशुधन विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विनामूल्य बियाणे उपलब्ध होणार
जमिनीत शेतकºयांनी जनावरांसाठी सुयोग्य वैरण, चारा पिके उदा. मका, ज्वारी, बाजरी किंवा न्यूट्री फिड इ. पिके घ्यावयाची आहेत, त्यासाठी उपलब्ध गाळपेर जमिनीत विनामूल्य बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल, जलाशयातील पाणी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. तरी शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.