शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या प्रकटमुलाखतींचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:05 AM

‘लायन्स अलिबाग फेस्टिवल-२०१९’चे आयोजन यंदा २४ ते २८ जानेवारी दरम्यान अलिबाग समुद्रकिनारी करण्यात आले आहे.

अलिबाग : ‘लायन्स अलिबाग फेस्टिवल-२०१९’चे आयोजन यंदा २४ ते २८ जानेवारी दरम्यान अलिबाग समुद्रकिनारी करण्यात आले आहे. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजता फेस्टिवलचे उद्घाटन झाल्यावर लगेच या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या प्रकटमुलाखतींचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष भगवान मालपाणी यांनी दिली आहे.मुलाखतकार सुधीर गाडगीळ राजकीय पक्षांच्या दिग्गज ज्येष्ठ पक्षप्रतिनिधींची मुलाखत घेणार आहेत. शिवसेना नेते राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, काँग्रेसचे नेते राज्यसभा सदस्य खा. हुसेन दलवाई, शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, भाजपा नेते आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष आ. मधू चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुनील तटकरे हे कोकणवासीयांच्या विकासाच्या मुद्द्यावर या प्रकट मुलाखत कार्यक्रमात आपली भूमिका मांडणार असल्याने, या कार्यक्रमाबाबत सर्वपक्षीयांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.शुक्रवार, २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘पेट ब्रीड आणि फॅशन शो’ होणार असून, संध्याकाळी ६.३० वाजता मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, अलिबागच्या उप नगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक आदी उपस्थित राहणार असल्याचे फेस्टिवल समिती समन्वयक अनिल जाधव यांनी सांगितले.शनिवार, २६ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता ‘हरित साजश्रृंगार’ या ताज्या भाज्या व फळांपासून दागिने बनविण्याच्या आगळ्या स्पर्धेचे आयोजन के लेआहे. तर संध्याकाळी ७ वाजता ‘लायन रायगड श्री २०१८’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या वेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रवीण ठाकूर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती फेस्टिवल समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली .>एकपात्री अभिनय स्पर्धारविवार, २७ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वा. एकपात्री अभिनय स्पर्धा, तर ७ वाजता हेअर अ‍ॅण्ड मेकअप शोचे आयोजन करण्यात आले आहे, या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आदी उपस्थित राहणार असल्याचे फेस्टिवल समितीचे उपाध्यक्ष परेश भाठेजा यांनी सांगितले. समारोप सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता उद्योगमंत्री अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आ. पंडित पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.