प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अखेर मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:26 AM2018-03-30T02:26:00+5:302018-03-30T02:26:00+5:30
अतिरिक्त पातालगंगा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात कासप -चावणे हद्दीतील मे. हुंदाई मोबीज इंडिया लिमिटेड कंपनीतील १२० कामगारांना कंपनीने अचानक
मोहोपाडा : अतिरिक्त पातालगंगा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात कासप -चावणे हद्दीतील मे. हुंदाई मोबीज इंडिया लिमिटेड कंपनीतील १२० कामगारांना कंपनीने अचानक प्रवेश नाकारला होता. तसेच या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्त शेतकºयांची फसवणूक केल्याने शेतकºयांनी आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर आमदार मनोहर भोईर यांनी कंपनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून कामगारांना व प्रकल्पग्रस्त शेतकºयांना न्याय मिळवून दिला.
कासप व चावणे परिसरातील स्थानिक शेतकºयांची जमीन मे. हुंदाई मोबीज इंडिया लिमिटेड कंपनीला गेली आहे. येथे प्रकल्प उभा राहताना कंपनीने शेतकºयांबरोबर आपलेपणाची वागणूक दिली; परंतु कंपनी उभी राहताच शेतकºयांकडे दुर्लक्ष केले. प्रकल्पग्रस्त शेतकºयांना ठरल्याप्रमाणे कंत्राट न देता कंपनीने बाहेरील कंत्राटदारांना काम दिले. लेखी आश्वासन देऊनही प्रकल्पग्रस्त शेतकºयांची फसवणूक होत असल्याने शेतकरी अरुण पाटील यांनी इतर शेतकºयांच्या मदतीने आमरण उपोषण सुरू केले होते. सात दिवसांत न्याय न मिळाल्यास अरुण पाटील हे विषप्राशन करून जीवन संपविणार असल्याचेही प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले होते; परंतु उपोषणाच्या चौथ्या दिवशीच आमदार मनोहर भोईर व शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरत आमरण उपोषणकर्ते अरुण पाटील यांना न्याय मिळवून दिला. या वेळी पाटील यांचे कंपनीचे विभागप्रमुख मुरली यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले.
हुंदाई कंपनीत काम करणाºया १२० कामगारांना गेटबाहेर ठेवले होते. त्यांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी आमदार भोईर यांनी हुंदाई एचओडी मुरली यांच्याशी चर्चा करून कामगारांना आत घेण्यास सांगितले. या वेळी १०१ कामगारांना लागलीच कामावर घेतले, तर १९ कामगारांना येत्या मंगळवारी घेणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी कामगारांच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या.