शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

स्मार्ट व्हिलेजसाठी प्रकल्पग्रस्तांची चळवळ

By admin | Published: November 24, 2015 2:03 AM

सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली. शेतीच्या जमिनीवर सिमेंटची जंगले उभारली. अत्याधुनिक असे शहर निर्माण केले. शहर विकासाचा एक नवा मापदंड जगाला घालून दिला

कमलाकर कांबळे, नवी मुंबई सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली. शेतीच्या जमिनीवर सिमेंटची जंगले उभारली. अत्याधुनिक असे शहर निर्माण केले. शहर विकासाचा एक नवा मापदंड जगाला घालून दिला. परंतु ज्यांच्या त्यागामुळे सिडकोने हा डोलारा उभारला, ते प्रकल्पग्रस्तच दुर्लक्षित राहिले. शहराचा विकास करताना येथील गावांचा विकास खुंटला. असे असले तरी प्रकल्पग्रस्तांच्या युवा पिढीने विकासाचा हा बॅकलॉग भरून काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी स्मार्ट व्हिलेजची संकल्पना तयार करण्यात आली आहे. आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या नवी मुंबईची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी संकल्पनेच्या प्रसारासाठी केंद्र शासनाकडून महापालिकेला दोन कोटींचे अनुदान मिळाले आहे. त्याद्वारे महापालिकेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीविषयी जनजागृती अभियान सुरू केले आहे. मात्र येथील मूळ गावांचा विकास झाल्याशिवाय स्मार्ट सिटीची संकल्पना अस्तित्वात येणार नाही, मात्र विकासाअभावी बकाल झालेल्या येथील मूळ गावांचा स्मार्ट सिटी अभियानाला अडथळा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या युवापिढीने येथील गावेच स्मार्ट करण्याचा निर्धार केला आहे. आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांची सुशिक्षित पिढी पुढे सरसावली आहे. सकारात्मक भूमिकेतून मागील सहा महिन्यांपासून हे प्रकल्पग्रस्त तरूण कामाला लागले आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील २८ गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी या तरूणाईने कंबर कसली आहे. त्यासाठी गावपातळीवर ग्रामस्थांचे प्रबोधन केले जात आहे. स्मार्ट व्हिलेज म्हणजे काय याविषयी माहिती देण्यासाठी फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. विशेष म्हणजे स्मार्ट व्हिलेजची संकल्पना विषद करण्यासाठी दीड तासाचे डॉक्युमेंटेशन तयार करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विविध स्तरावर त्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. त्याला ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या या तरूण पिढीचा उत्साह दुणावला आहे.शहरी भागात आलिशान इमारती, प्रशस्त रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय सुविधा आदींची नियोजनबध्द पध्दतीने आखणी केली. परंतु उपनगराचा विकास करताना येथे असलेल्या मूळ गावांकडे मात्र सिडकोचे दुर्लक्ष झाले. सिडकोच्या नियोजनात राहून गेलेली समतोल विकासातील ही त्रुटी जागतिक स्तरावर नोंद झालेल्या या शहराच्या लौकिकास बाधा निर्माण करणारी ठरली आहे. शहराचा विकास करताना येथील मूळ गावेही विकासाच्या टप्प्यात येणे गरजेचे होते. मात्र सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या गावांची अवस्था झोपडपट्ट्यांपेक्षाही भयानक झाली आहे. गेल्या चाळीस वर्षांत प्रकल्पग्रस्तांची कुटुंबे वाढली. मुलांची, नातवंडांची लग्ने झाली. या विस्तारित कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकामे उभारली. या अनियंत्रित बांधकामांमुळे गावे बकाल झाली आहेत. जुन्या कौलारू घरांची जागा ओबडधोबड इमारतींनी घेतली आहे. ग्रामस्थांना प्रलोभने दाखवून भूमाफियांनी गावातील मोकळ्या जागा बळकावल्या. त्यावर बेकायदा चाळी आणि टोलेजंग इमारती उभारल्या. त्यामुळे गावांतील प्रशस्त रस्त्यांचे पायवाटेत रूपांतर झाले आहे. वीस वर्षांपूर्वी ज्या घरांच्या दारापर्यंत चारचाकी वाहने जायची आता तेथपर्यंत रिक्षा नेणेही अवघड होवून बसले आहे. नाले आणि गटारांचे अस्तित्व संपुष्टात आल्याने सांडपाणी वाहून नेण्याची जबाबदारी उरल्यासुरल्या रस्त्यांवर येवून ठेपली आहे. एकूणच या गावांतील प्राथमिक सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतकार्य पोहचविताना कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या युवा ब्रिगेडने उचललेले हे पाऊल भावी पिढीसाठी आशादायक ठरणारे आहे.आगरी-कोळी युथ फाउंडेशनने २0 सुशिक्षित युवकांची एक कोअर कमिटी तयार केली आहे. यात सी.ए., डॉक्टर्स, वकील, वास्तुविशारद व उच्चशिक्षित उद्योजकांचा समावेश आहे. स्मार्ट व्हिलेजच्या निर्मितीसाठी या कमिटीने तयार केलेल्या प्रेझेंटेशनला प्रत्येक स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. लवकरच खासदार, आमदार आणि महापौर यांच्यासमोर याचे सादरीकरण केले जाणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील यांनी दिली.