शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला प्रकल्पग्रस्तांचा विरोध; चिंचपाड्यात पोलिसांनी केला लाठीचार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 1:28 AM

अनेक जण जखमी ; सिडकोने ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप 

पनवेल : सिडकोच्या  सिडकोच्या अतिक्रमण पथकामार्फत चिंचपाडा गावातील घरांवर गुरुवारी कारवाई करण्यात येणार असल्याने चिंचपाडा प्रकल्पग्रस्तांनी या कारवाईला विरोध करीत आधी मोबदला द्या नंतर कारवाई करा अशी भूमिका घेत सिडकोच्या कारवाईला विरोध केला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने अनेक महिला जखमी झाल्या असून त्यात लहान मुलीचा समावेश  आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ग्रामस्थांना वडघर, करंजाडे या ठिकाणी हलविण्यात आले. विमानतळ बाधितांसाठी सिडकोच्या वतीने वडघर पुष्पकनगर वसवण्यात आले. 

या ठिकाणी अजून कोणत्याच प्राथमिक सोयी-सुविधा नसल्याने बाधित येथे राहायला गेले नाहीत. आपली गावातील घरे तोडून ग्रामस्थांना त्या घरांची किंमत सिडको देणार आहे. त्या किमतीतून वडघर पुष्पकनगरमध्ये घरे बांधायची आहेत. चिंचपाडा या गावातील अनेक कुटुंब करंजाडेमध्ये राहायला गेले आहेत. सिडकोने सोयी-सुविधांचे केवळ आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात सिडकोने ग्रामस्थांची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला जात आहे. सिडकोकडे प्रकल्पग्रस्तांनी ज्या मागण्या समोर ठेवल्या, त्या मागण्यांकडे सिडको पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.चिंचपाडा गावातील काही घरे तोडण्याचे शिल्लक आहेत. गुरुवारी प्रकल्पग्रस्तांनी अतिक्रमण पथकाला घोषणा देत विरोध केला, मात्र पोलीस प्रशासनाने या पन्नास ते साठ जमलेल्या मोर्चेकरांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठी चार्जमध्ये अनेक महिला व एक लहान मुलगी जखमी झाली आहे.