Raigad: परप्रांतीयांची कामगार भरती, उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्सविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 03:40 PM2023-11-16T15:40:14+5:302023-11-16T15:41:02+5:30

Raigad: उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेडच्या रासायनिक द्रव्ये साठवण प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना डावलून होत असलेल्या परप्रांतीय कामगारांच्या भरती विरोधात स्थानिक भुमीपुत्र संतप्त झाले आहेत.

Project victims protest against Indian Oil Adani Ventures in Uran-Dhutum, recruitment of migrant workers | Raigad: परप्रांतीयांची कामगार भरती, उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्सविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

Raigad: परप्रांतीयांची कामगार भरती, उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्सविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

- मधुकर ठाकूर
उरण  - उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेडच्या रासायनिक द्रव्ये साठवण प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना डावलून होत असलेल्या परप्रांतीय कामगारांच्या भरती विरोधात स्थानिक भुमीपुत्र संतप्त झाले आहेत.संतप्त झालेल्या भुमीपुत्रांनी २० नोव्हेंबरपासून सर्व पक्षियांनी धुतुम ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली २३ प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणाचा बसणार आहेत.

उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग ही रासायनिक द्रव्ये साठवण करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे.२५ वर्षांपूर्वी ५७ एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी धुतुम गावातील सुमारे ८३ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत.मात्र प्रकल्पात अद्यापही फक्त २७ प्रकल्पग्रस्तांनाच नोकरीत सामावून घेतले आहे. उर्वरित ५६ शेतकरी आणि त्याचे सुमारे २०० वारसदार अद्यापही प्रकल्पात नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांचा प्रकल्पाविरोधात संघर्ष सुरू आहे.

त्यानंतर दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग ही रासायनिक द्रव्ये साठवण करणारा प्रकल्प देशातील सर्वात मोठे भांडवलदार अदाणी यांच्या इंडियन ऑईल अदानी वेंचर्सने घेतला आहे.प्रकल्पाचे मालक बनलेल्या अदानी वेंचर्सने कामगार भरतीमध्ये स्थानिकांवर अन्याय करण्यास सुरुवात केली आहे. धुतुम गावात अनेक तरुण -तरुणी उच्चशिक्षित, पदवीधर आहेत.मात्र नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी परप्रांतीय कामगारांची भरती केली जात आहे.याबाबत प्रकल्प व्यवस्थापनाशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.आस्थापनावर भरती करण्यात आलेल्या परप्रांतीय कामगारांना वगळून तत्काळ स्थानिकांची कामगारांची भरती करण्याचा निर्णय १५ दिवसात घेण्यात यावा अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली होती.मात्र ग्रामपंचायतीच्या पत्राची अदाणी वेंचर्सने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.त्यामुळे धुतुम ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच २० नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय  आमरण उपोषणात २३ प्रकल्पग्रस्त सहभागी होणार आहेत.त्यानंतरही सकारात्मक तोडगा न निघाल्यास प्रसंगी न्याय हक्कासाठी न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील यांनी गुरुवारी (१६) आयोजित पत्रकार परिषदेतून जाहीर केला आहे.या प्रसंगी सर्वच पक्षीय सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Project victims protest against Indian Oil Adani Ventures in Uran-Dhutum, recruitment of migrant workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड