अलिबाग तालुक्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन

By निखिल म्हात्रे | Published: October 8, 2023 01:11 PM2023-10-08T13:11:40+5:302023-10-08T13:12:09+5:30

एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लाभ दिला जाईल. त्यासाठी एक गट प्रवर्तक, गट मार्गदर्शक व तज्ज्ञ प्रशिक्षकाची निवड न केली जाईल.

Promotion of Organic Farming in Alibaug Taluk | अलिबाग तालुक्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन

अलिबाग तालुक्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन

googlenewsNext

अलिबाग - कृषि विभागमार्फत अलिबाग तालुक्यात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजने अंतर्ग अलिबाग तालुक्यासाठी ५०० हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य देण्यात आले आहे. शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त वापर, त्यामुळे खालावलेला जमिनीचा पोत तसेच, रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीचे मानवी आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम याला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेची सुरुवात कृषि विभागमार्फत अलिबाग तालुक्यात करण्यात आली आहे. 

या योजनेचा कालावधी ३ वर्षांचा असणार आहे. ही योजना १०० टक्के अनुदानावर राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या योजनांतून शेतकऱ्यांना मदत करणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, मोठ्या क्षेत्राचे प्रमाणीकरण व कृषी विकास योजनेतून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतीमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रसायन अवशेषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होईल.

सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, तिचा इतरत्र प्रसार करणे, शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे आदी योजनेची उद्दिष्टे आहेत. या योजनेत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनीची देखील नोंदणी करण्यात येणार आहे. एक किंवा सलग क्षेत्र असलेल्या गावात किमान १० हेक्टर ते ५० हेक्टर क्षेत्राचा एक गट तयार करावा लागेल. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लाभ दिला जाईल. त्यासाठी एक गट प्रवर्तक, गट मार्गदर्शक व तज्ज्ञ प्रशिक्षकाची निवड न केली जाईल.

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीमिशन योजने अंतर्गत लागवड ते काढणी, ब्रेडिंग व मार्केटिंग, प्रमाणीकरणापर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी, आदिवासी शेतकरी, शेतकरी गट यांनी या योजनेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे. - प्रदीप बैनाडे, तालुका कृषि अधिकारी, अलिबाग.

Web Title: Promotion of Organic Farming in Alibaug Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.