उरण : उरण मतदारसंघात अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने दसºयाचा मुहूर्त साधून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. रॅली, मिरवणूक आणि थेट मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा धुरळा उडविला आहे. मतदार मात्र समस्या सोडविणाºया लोकप्रतिनिधीच्या शोधात असल्याचे दिसून येत आहेत.उरण विधानसभा मतदारसंघात आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत सेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी अशीच तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. यापैकी काही उमेदवारांनी निवडणूक जाहीर होण्याआधीच प्रचारपत्रके, कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचवले आहेत. यामध्ये सर्वात अग्रेसर राहिले आहेत ते भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी. महायुतीतून विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनाच उमेदवारी मिळेल याची खुणगाठ बालदी यांनी याआधीच बांधली होती. सेना-भाजप महायुतीची घोषणा झाल्यानंतर भाजपप्रणित केंद्र, राज्य सरकार आणि जेएनपीटीच्या माध्यमातून उरण मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करता येणार नाही. हे ध्यानी आल्यानंतर बालदी यांनी तत्परता दाखवित मतदारांसमोर मागील काही वर्षांपासून केलेल्या विकासकामांचा अहवाल भाजपच्या नावाखाली प्रसिद्ध केला आहे. त्याचबरोबर मतदानाच्या स्लीप, मतदारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी मतदारांपर्यंत पोहोचवण्यात बालदी यांनी राजकीय खेळी साधली आहे. मात्र, या अहवालात केलेल्या अनेक विकासकामांच्या दाव्यांबद्दल मतदारसंघातील मतदारांचा आक्षेप आहे. यामध्ये मुदतीत अपूर्ण अवस्थेत असलेली तीन हजार कोटींची उड्डाणपूल, ६-८ लेन रस्ते, जेएनपीटी साडेबारा टक्क्के विकसित भूखंड वाटप, करंजा मच्छीमार बंदर, जेएनपीटी एसईझेड आदी कामांचा समावेश आहे.मनोहर भोईर यांनीही जागर भगव्याचा नावाखाली कार्य अहवाल प्रसिद्ध केला आहे. आमदारकीच्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची ९२ पानी जंत्री यात मांडली आहे. मात्र, उरणमधील जनतेला वर्षानुवर्षे अनेक समस्या सतावत असून त्या सोडविण्यास लोकप्रतिनिधी म्हणून मनोहर भोईर अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे.जनतेच्या विकासाऐवजी ठेकेदारीच्या कामातच अधिक रस दाखविणाºया भोईर यांना घोषणा करूनही १०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारता आले नाही. जेएनपीटी-बेलापूर दरम्यान दररोज होणाºया वाहतूककोंडीवर पाच वर्षांत तोडगा निघाला नाही. औद्योगिकरण झपाट्याने होत असतानाही बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना उरणमध्ये सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. जेएनपीटी साडेबारा टक्क्के विकसित भूखंडवाटपाचा प्रश्नही ३० वर्षांपासून प्रलंबित आहे. घोषणा होऊन ५० वर्षांत रेल्वे उरणपर्यंत पोहोचलेली नाही. सर्व्हिस रोड नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शेकापचे उमेदवार विवेक पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चार वेळा आमदारकी भोगलेल्या पाटील यांचा कार्यअहवाल, जाहीरनामा अद्याप मतदारांपर्यंत पोहोचवलेला नाही. त्यांच्या २० वर्षांपासून आमदारकीच्या काळात असलेल्या प्रलंबित समस्यांची स्थिती जैसे थे अशीच आहे. प्रकृतीच्या तक्रारी असताना, आमदारकी लढविण्याची शेवटची संधी असल्याची जाणीव झाल्यावर विवेक पाटील निवडणुकीत उतरले आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण निवडणूक लढवित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ मिळेल, असा त्यांचा होरा आहे. मात्र, चार वेळा आमदारकी भोगलेल्या विवेक पाटील यांच्या विकासकामांचा लेखाजोखा मतदारांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे मतदारांकडे अपक्षांसह इतर पक्षांचे उमेदवार असले तरी त्यापैकी तूर्तास तीनच उमेदवारांचे पर्याय उपलब्ध आहेत. मनोहर भोईर यांना मतदारांनी एक तर विवेक पाटील यांनाही चार संधी दिल्या आहेत. अपक्ष उमेदवार महेश बालदी एकेकाळी भाजपचे तर विद्यमान आमदार मनोहर भोईर सेनेचे असल्याने त्यांच्याकडे मतदार नाण्याच्याच दोन बाजू म्हणून पाहत आहेत. त्यामुळे या तीनही उमेदवारांना जनता निवडणुकीत नक्कीच जाब विचारतील, अशीच आजची स्थिती आहे. दरम्यान, उरण मतदारसंघात दसºयाच्या मुहूर्तावर उमेदवारांचा प्रचाराचा धुरळा उडविला आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर उडाला प्रचाराचा धुरळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 5:12 AM