मालमत्ता लाखोंची, कुलूप शंभराचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 12:45 AM2021-01-03T00:45:02+5:302021-01-03T00:45:02+5:30
कुलूप खरेदी करताना काटकसर : चोऱ्या करणाऱ्यांची चैन; स्वस्त कुलपांना मागणी
निखिल म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : स्वप्नातले सत्यात उतरविताना प्रयत्नांची पराकाष्टा करून लाखो रुपये घराचे बांधकाम मजबूत करण्यासाठी खर्च करीत असतात. आपण राहत असलेले घर हे रेखीव व मजबूत असावे, म्हणून घरमालक मोठी किंमत मोजायला तयार असले, तरी या घराची सुरक्षा करणारे कुलूप मात्र स्वस्त दरातील खरेदी करण्यात असल्याने याचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्यांचे प्रकार वाढले आहेत.
घराची सुरक्षा करणारे कुलूप चोरट्यांकडून विविध तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांपुढे घराला लावलेले कुलूप टिकत नाही. कुलूप कितीही मोठे असले, तरी चोरट्यांना ते सहज तोडता येते. घराला असलेले हँडल आणि कडी चोरटे सहज तोडतात. याकरिता वापरले जाणारे साहित्य घरमालक अतिशय स्वस्त दरातले खरेदी करत असल्याचे दिसून येते.
घराकरिता लाखो रुपये मोजणारी मंडळी कुलूप खरेदी करताना स्वस्तातील कुलूप कोणते आहे, याचाच शोध घेतात. यामुळे चोरट्यांना कुलूप तोडताना फारसा वेळ लागत नाही.
घरासाठी लागणारे लाॅक विकत घेताना घरमालक अगदी स्वस्तातील कुलुपाचीच मागणी करीत आहेत. सध्या किंमत ४५ रुपयांपासून ते ५,००० रुपयांपर्यंत आहे. सर्वसाधारण ग्राहक ६० ते १५० रुपयांपर्यंत कुलूप
खरेदी करतात, तर मोर्टिस लॉक आणि राउंड पॅडलॉक खरेदी करणारे
ग्राहक तुरळकच आहेत. या कुलुपांच्या
किमती ग्राहकांच्या बजेटच्या
बाहेर असल्याने, आपल्या
खिशाला परवडेल इतक्याच किमतीचे कुलूप ग्राहक विकत घेताना दिसत आहेत.
वर्षभरात ३५५ घरफोडीच्या घटना
घरफोडी आणि चोरीच्या घटनांसोबत जबरी चोरीच्या घटनांनी हैराण करून सोडले होते. जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या, त्यामधील काही उघड करण्यात आल्या आहेत, तर घरफोडीच्या जिल्ह्यात ३५५ घटना घडल्या आहेत. यामध्ये २३२ तपासावर प्रलंबित आहेत, तर १ वर्ष कालावधी वरील तपासावर २३ प्रलंबित आहेत. या घटनांममुळे नागरिक हैराण झाले असून कारवाईची मागणी होत आहे.
n घराकरिता लाखो रुपये मोजणारी मंडळी कुलूप खरेदी करताना स्वस्तातील कुलूप कोणते आहे, याचाच शोध घेतात. यामुळे चोरट्यांना कुलूप तोडताना फारसा वेळ लागत नाही.
n घराची सुरक्षा करणारे कुलूप चोरट्यांकडून विविध तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांपुढे घराला लावलेले कुलूप टिकत नाही. कुलूप कितीही मोठे असले, तरी चोरट्यांना ते सहज तोडता येते.