खारभूमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:06 AM2018-03-29T01:06:44+5:302018-03-29T01:06:44+5:30
रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रथमच खारेपाटातील लाभक्षेत्रात खारेपाणी घुसून झालेल्या
अलिबाग : रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रथमच खारेपाटातील लाभक्षेत्रात खारेपाणी घुसून झालेल्या नुकसानाची नोंद घेऊ न शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून शासनास प्रस्ताव सादर केला आहे. ‘विशेष बाब’ म्हणून खारभूमी नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत मंजूर करावी, असा प्रस्ताव राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना सादर केला आहे. शेतकºयांसाठी घेतलेल्या निर्णयाचे श्रमिक मुक्ती दल रायगड स्वागत करून आभार व्यक्त करीत असून, तसे लेखी पत्र जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.
श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून खारेपाटातील जमिनींना दुपीकी करण्यासाठी आंबाखोरे प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी, खारेपाटातील नापीक जमिनी सुपीक होण्यासाठी, खारेपाटातील नापीक जमिनींच्या शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी २० एप्रिल २००७ ते ४ मे २००७ असे सलग १६ दिवसांचे केलेले ठिय्या आंदोलन याचा संपूर्ण इतिहास याच आभारपत्रात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना सादर केला आहे.
खारेपाटातील या मागण्यांसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या समवेत बैठक होऊन त्या तत्त्वत: मान्य झाल्या होत्या आणि किमान त्यावर चर्चा सुरू झाली. १४ आॅक्टोबर २००७ रोजी ‘समृद्ध कोकण सुंदर कोकण परिषद’ श्रमिक मुक्ती दलाने घेतली होती, त्यात ४० गावांतील शेतकºयांचा सहभाग होता. आंबाखोरे प्रकल्पाचे पाणी व खारेपाटाचा विकास व नुकसान भरपाई व इतर मागण्यांसहित १० हजार शेतकºयांनी एक रात्रभर कुलाबा किल्ल्यात स्वत:ला कोंडून घेऊ न अभूतपूर्व आंदोलन केले होते. मात्र, या मागण्या रीतसर पद्धतीने शासनापर्यंत या पूर्वीच्या कोणत्याही जिल्हाधिकाºयांनी वरिष्ठ स्तरावर व राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.