मधुकर ठाकूर।
उरण : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाची उंची वाढविण्याच्या तयारीला एमआयडीसी लागली आहे. सध्या उपलब्ध असलेली उंची आणखी २० फुटांपर्यंत वाढविण्याची योजना असून, त्यासाठी ७२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. उंची वाढविण्यात आल्यानंतर धरणाची क्षमता दुपटीने वाढणार आहे. या प्रकल्पावर १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती एमआयडीसीचे रानसई विभागाचे सहायक अभियंता सी.एन.पाटील यांनी दिली.
धरणाच्या पाण्याची पातळी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच कमी होते. त्यामुळे उरणकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे सिडकोच्या हेटवणे, बारवी धरणातून पाणी घेण्याची वेळ दरवर्षी एमआयडीसीवर येते. त्यामुळे रानसई धरणाची उंची आणखी २० फुटांपर्यंत (३ मीटर) वाढविण्याची योजना एमआयडीसीने दहा वर्षांपूर्वी तयार केली होती. या प्रस्तावित योजनेचा अंदाजित खर्च सुमारे ३० कोटींच्या आसपास होता. मात्र, याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीं, तत्कालीन सरकारच दुर्लक्ष झाले. आता मात्र, धरणाची उंची वाढविण्याची नवी योजना लवकर कार्यान्वित करण्यासाठी एमआयडीसीने कंबर कसली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या ७२ हेक्टर जमिनीपैकी फक्त १५ हेक्टर जमीन खासगी मालकीची तर उर्वरित वन आणि महसूल विभागाच्या अखत्यारीतील आहे. या विभागाकडून घेतल्या जाणाºया जमिनीच्या बदल्यात एमआयडीसीच्या मालकीची तितकीच जमीन देण्यात येणार आहे. याबाबतही शासकीय विभागाने सहमती दर्शविली आहे. उर्वरित १५ हेक्टर खासगी जमिनीच्या मालकांना तत्काळ मोबदला देण्याचीही तयारीही एमआयडीसीने सुरू केली आहे, तसेच रानसई ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखल्याच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.३५ कोटी रुपयांची थकबाकीरानसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या एमआयडीसीकडे मालमत्तेच्या कराची मागील ३० वर्षांपासून सुमारे ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मागणीनंतरही मालमत्ता कराची रक्कम अदा करण्यास एमआयडीसीकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याची माहिती सरपंच गीता अनिल भगत यांनी दिली.दाखला प्राप्त होताच योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर, दोन वर्षांच्या मुदतीत काम पूर्ण करण्याची तयारी असल्याची माहिती सहायक अभियंता सी.एन.पाटील यांनी दिली.