संरक्षक बंधारे फाेडून सागरी उधाणाचे खारेपाणी घूसले माेठे शहापूर गावच्या भातशेती जमिनीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 05:14 PM2018-01-05T17:14:41+5:302018-01-05T17:15:22+5:30

अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यांतील समुद्र उधाण संरक्षक बंधाऱ्यांच्या डागडूजी आणि दूरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षात केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र सरक्षक बंधारे सागरी उधाणाच्या भरतीने फूटण्याची समस्या आणि खारेपाणी जवळच्या भातशेती जमीनीत घूसून

Protected Bondage Phadee Marine Emptying Shedding Land in Shahapur Village Paddy Land | संरक्षक बंधारे फाेडून सागरी उधाणाचे खारेपाणी घूसले माेठे शहापूर गावच्या भातशेती जमिनीत

संरक्षक बंधारे फाेडून सागरी उधाणाचे खारेपाणी घूसले माेठे शहापूर गावच्या भातशेती जमिनीत

Next

जयंत धुळप

रायगड: अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यांतील समुद्र उधाण संरक्षक बंधाऱ्यांच्या डागडूजी आणि दूरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षात केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र सरक्षक बंधारे सागरी उधाणाच्या भरतीने फूटण्याची समस्या आणि खारेपाणी जवळच्या भातशेती जमीनीत घूसून त्या जमीन नापीक हाेण्याची समस्या आता अत्यंत उग्रस्वरुप धारण करु लागली असून चिंताग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निमार्ण झाली आहे. गुरुवारी रात्री पाैष कृ.तृतियेच्या दिवशी रात्री सागरी उधाणाच्यावेळी माेठे शहरापूर गावाच्या पूर्व-पश्चिम बाजू कडील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांस एकूण १० ठिकाणी माेठी भगदाडे (खांडी) पडून उधाणाचे खारेपाणी या ३०० एकर भातशेतीत घूसून पूढे माेठे शहापूर गावांतील २५ तर धाकटे शहापूर गावांतील १७ घरांच्या पाया पर्यत पाेहाेचून या सर्व घरांच्या भाेवती समुद्रासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.


१० ठिकाणी संरक्षक बंधाऱ्यास माेठी भगदाडे, २० मत्स्य तलावांतील मासे वाहून जावून ३० लाखाचे नुकसान


शासनाच्या खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या सरखार बंधाऱ्यास चार ठिकाणी, पांडेलेशिल संरक्षक बंधाऱ्यास दाेन ठिकाणी, लेहरीकाेठा बंधाऱ्यस एका ठिकाणी तर भंगारकाेठा संरक्षक बंधाऱ्यास एक ठिकाणी व अन्य दाेन अशा एकून १० ठिकाणी संरक्षक बंधाऱ्यास माेठी भगदाडे पडून हे खारेपाणी गावांतील वस्तीपर्यत घूसले आहे. १०० वर्ष जून्या जि.प.शाळा ईमारतीला देखील खाऱ्यापाण्याचा वेढा पडला असल्याची माहिती श्रमिक मु्क्ता दलाचे समन्वयक तथा शहापूर मधील शेतकरी राजन भगत यांनी लाेकमत शी बाेलताना दिली आहे.

शहापूर-धेरंड गावे ही जिताडा, काेळंबी आणि खाेल या माशांच्या शेती व संवर्धनाकरीता सुप्रसिध्द आहेत. या मत्य संवर्धनाकरिता या गावांमध्ये घरटी एक मत्य तलाव असे तलाव आहेत. दरम्यान गुरुवारी रात्रीच्या या उधाणाचे खारेपाणी धाकटे शहापूर गावांतील एकूण २० मत्स्य तलावांत घूसुन पूढे वाहात गेल्याने तयार मासळी वाहून गेल्याने, मस्यशेतकऱ्यांचे माेठे आर्थिक नुसकान झाले आहे. मत्स शेतीच्या नुकसानीचा एकूण आकडा सूमारे ३० लाखाच्या घरात पाेहाेचला असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.

बारा तास उलटून गेले तरी शासकीय कर्मचारी वा अधिकारी फिरकलेला नाही

बारा तास उलटून गेले तरी काेणत्याही शासकीय विभागाचा काेणताही कर्मचारी वा अधिकारी अद्याप या परिसरात फिरकलेला नाही. माेठे शहापूर गावांत शेतकऱ्यानी संध्याकाळी बैठक बाेलवाली असून त्यात पूढील दिशा निश्चित करण्यात येईल असे भगत यांनी अखेरीस सांगीतले.

Web Title: Protected Bondage Phadee Marine Emptying Shedding Land in Shahapur Village Paddy Land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.