संरक्षक बांध फोडून शेतजमिनीत खारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:07 AM2017-12-08T01:07:55+5:302017-12-08T01:08:00+5:30

खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावाजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे)

Protected dams break salt water in the soil | संरक्षक बांध फोडून शेतजमिनीत खारे पाणी

संरक्षक बांध फोडून शेतजमिनीत खारे पाणी

googlenewsNext

जयंत धुळप
अलिबाग : खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावाजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) फुटून गेल्या ४ नोव्हेंबर रोजी दहा गावांतील सुमारे २३०० एकर भातशेतीमध्ये खारे पाणी घुसून १३०० शेतकरी कुटुंबांच्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर आता रविवारी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री याच परिसरातील खारपाले, देवळी, जुई, म्हैसबाड, ढोंबी आणि गडब या सहा गावांतील तब्बल २८०० एकर भातशेती जमिनीत समुद्राचे खारे पाणी घुसल्याने १६०० शेतकरी कुटुंबे पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले असल्याची माहिती खारडोंगर मेहनत आघाडी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग तुरे आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
जुई-आब्बास, म्हैसबाड, खारडोंबी, खारघाट, खारचेरबी आणि माचेला या शासकीय खारभूमी योजनांतील हे संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीच्या तडाख्याने रविवारी रात्री व सोमवारी सकाळी फुटून हे खारे पाणी शेतीमध्ये घुसले आहे. गतवर्षी अशाच प्रकारे संरक्षक बंधारे फुटून खारे पाणी भातशेतीत घुसून झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासकीय महसूल यंत्रणेने केले नसल्याने शेतकºयांना कोणत्याही प्रकारची शासकीय नुकसान भरपाई मिळू शकली नाही. त्यानंतर मे २०१७ मध्ये आलेल्या उधाणाच्यावेळी देखील संरक्षक बंधारे फुटून सुमारे १२०० एकर भातशेतीत खारे पाणी घुसले, त्यावेळी पंचनामे केले, परंतु शासकीय मदत तेव्हाही मिळाली नाही. तिसºयांदा ४ नोव्हेंबर २०१७ रोजी उधाणाने संरक्षक बंधारे फुटून खारे पाणी २३०० एकर भातशेतीत घुसले. पेण उप विभागीय कार्यालयासमोर शेतकºयांनी उपोषण आंदोलन केले, त्यानंतर नुकसानीची पाहणी होवून पंचनामे झाले, परंतु नुकसान भरपाई शेतकºयांना देण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. खारभूमी विभागाच्या या निष्क्रिय आणि बेफिकीर कारभारामुळे आता शेतकरी व ग्रामस्थ संतप्त झाले असल्याचे शिवकर यांनी सांगितले.
४ नोव्हेंबरचे उधाण आणि शेती नुकसानीनंतर नुकसान भरपाई मिळावी या मागणीकरिता पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या कार्यालयासमोर शेतकºयांनी उपोषण आंदोलन सुरू केल्यावर, पुदलवाड यांच्याकडे झालेल्या संयुक्त बैठकीत जेएसडब्ल्यू कंपनीने संरक्षक बंधारे बांधून देण्याचे मान्य केले होते. परंतु या नुकसानग्रस्त गावांतील बापदेव मंडळाने या समस्येबाबत पर्यावरणाच्या मुद्द्यावर हरित न्यायालयात दाद मागितली असल्याने संरक्षक बंधाºयाचे काम करण्याकरिता नाल्यात तात्पुरते पाइप टाकण्याकरिता या शेतकºयांनी विरोध केल्याने जेएसडब्ल्यू कंपनीस संरक्षक बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम करता आले नाही.
परिणामी रविवार-सोमवारच्या उधाणात संरक्षक बंधारे फुटून हे खारे पाणी २८०० एकर भातशेतीत घुसून मोठे नुकसान झाले असल्याचे शिवकर यांनी सांगितले.


बैठकीत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
१संरक्षक बंधारे नव्याने बांधणे व असलेल्या बंधाºयांची दुरुस्ती करणे ही जबाबदारी ज्या खारलॅन्ड विभागाची आहे, तो खारलॅन्ड विभाग सातत्याने नामानिराळाच रहातो आणि शेतकºयांच्या रोषाला सातत्याने महसूल यंत्रणेस सामोरे जावे लागते, या परिस्थितीत देखील बदल होण्याच्या दृष्टीने या शेतकºयांना निर्णय अपेक्षित आहे.
२गेल्या ४ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या मोठ्या उधाणामुळे संरक्षक बंधारे फुटून २३०० एकर भातशेतीत खारे पाणी शिरून अपरिमित नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी शुक्रवारी८ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी चार वाजता पेण उप विभागीय महसूल कार्यालयात सर्व संबंधितांची बैठक बोलावली आहे.
३या बैठकीत मागील सर्व उधाण नुकसानीबरोबरच रविवार-सोमवारच्या या ताज्या २८०० एकरातील भातशेती नुकसानीवरून वातावरण तप्त होणार असल्याची चिन्हे आहेत. या बैठकीत सुयोग्य निर्णय झाला नाही तर अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय देखील शेतकºयांनी घेतला आहे.

४० शेतकºयांच्या जमिनी जेएसडब्ल्यूने केल्या खरेदी
माचेला गावातील किनारी भागातील ३० ते ४० शेतकºयांच्या शेतजमिनी जेएसडब्ल्यू कंपनीने घेतल्या आहेत. परिणामी हे ३० ते ४० शेतकरी आता संरक्षक बंधाºयाच्या सामूहिक दुरुस्ती कामास येत नाहीत.
परिणामी या क्षेत्रातील संरक्षक बंधाºयांची दुरुस्तीच होत नसल्याने या बांधांची अवस्था बिकट झाली आहे.
जेएसडब्ल्यू कंपनीने घेतलेल्या या ३० ते ४० शेतकºयांच्या शेतातील माती घेवून येथील संरक्षण बंधाºयांची दुरुस्ती करून, यापुढे होणारी संभाव्य नुकसानी टाळावी, अशी मागणी आता शेतकºयांनी केली असल्याचे शिवकर यांनी सांगितले.

Web Title: Protected dams break salt water in the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.