पनवेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेला नारायण राणे कुटुंबीयांच्या ‘नीलेश फार्म’च्या संरक्षण भिंतीवर बांधकाम विभागाने अखेर कारवाई केली. या परिसरातील संपादित केलेल्या जमिनीवरील अनेक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.महामार्गाच्या रुंदीकरणासाठी राणे कुटुंबीयांची जमीनही संपादित केली असून, संबंधितांना जवळपास ८० लाखांचा मोबदला दिलेला आहे. संबंधित जागेची भरपाई देऊनही प्रत्यक्षात जमीन ताब्यात घेतलेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘नीलेश फार्म’ची जागा संपादित होऊन आणि मोबदला देऊनही रुंदीकरणात हस्तांतरित करण्यात न आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागावरदेखील टीकेची झोड उठली होती. त्यानंतर, सोमवारी बांधकाम विभागाने डोलघर, कर्नाळा व तारा गावच्या हद्दीतील संपादित जमिनीवरील बांधकामे हटविण्याची कार्यवाही करण्यात आली, तसेच अनेक बांधकामे दिवसभरात हटविण्यात आली आहेत. ‘नीलेश फार्महाउस’वरील संरक्षण भिंत हटविण्यात आली आहे, परंतु संपादित जमिनीवर बांधकाम केलेले असून, ते बांधकाम हटविले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.आजची कारवाई हा भूसंपादन विभागाचा निव्वळ दिखावा असून, राणे यांच्या फार्महाउसची फक्त संरक्षक भिंतच तोडली आहे. मात्र, इतर ठिकाणी केलेल्या कारवाईत नागरिकांना सामान काढण्यास वेळ दिलेला नसून ही कारवाई पक्षपाती आहे.- संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते, पनवेलडोलघर, कर्नाळा आणि तारा या ठिकाणची बांधकामेदेखील हटविण्यात आली असून, ‘नीलेश फार्म’वर संपादित जागेवरील बांधकामदेखील आहे. या ठिकाणी असलेली घरेदेखील हटविण्यात येणार आहेत.- प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय अधिकारी, पेणनारायण राणे यांची जागा व संपादित जागेचा मोबदलानीलम नारायण राणे १६७/१ १३२० चौ.मी. मोबदला - ४३,३७,५५६नारायण तातू राणे १६७/२ ८१० चौ.मी. मोबदला - ३६,७८,०१५
नारायण राणेंच्या फार्महाउसची संरक्षण भिंत हटविली, महामार्ग रुंदीकरणासाठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 1:36 AM