संतोष सापते श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या समुद्राच्या संरक्षक भिंतीस अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने थैमान घातले आहे. भरतीच्या वेळी लाटा रस्त्यावर उतरून अपघाताची शक्यता वेळास-आदगाव रस्त्यावर वाढली आहे.श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. सर्वा, नानवेल व दिघीची वाहतूक या मार्गावरून होत असून लोकसंख्याही मोठी आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच वेळास व सर्वा येथील सर्व विद्यार्थी शाळेसाठी आदगाव विद्यालयात याच रस्त्याने जात असल्याने त्यांच्याही जीवास धोका आहे.श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. वेळास या गावी प्रसिद्ध भैरवनाथाचे मंदिर आहे. आदगावचा समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करत आहे.तालुक्यातील लहान मच्छी विक्र ी करणारे आदगावमधून मासळी खरेदी करतात. त्यामुळे सदर मार्गावर सदैव वर्दळ असते.वेळास ते आदगाव ५ किलोमीटरचे अंतर आहे. रस्त्याच्या रु ंदीचा विचार करता अंदाजे १६ फूट रु ंदी आहे. तसेच दुतर्फा मातीची साइडपट्टी तीन तीन फूट आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूस आदगावचा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी भिंत बांधण्यात आली आहे. मात्र तीन किलोमीटर अंतराच्या संरक्षण भिंतीच्या परिसरात अनेक ठिकाणी सध्या मोठमोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. संरक्षक भिंतीस सुद्धा तडे गेली आहेत. मुख्य रस्त्याच्या बाजूस मोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दररोज या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना खड्ड्यांची कल्पना आहे, परंतु पर्यटकांना मात्र वाहन चालवताना कसरत करावी लागते.वेळास-आदगाव मार्गे सर्वा या मार्गावर एसटीच्या १२ फेºया नियमित चालतात. तसेच खाजगी वाहतूक करणाºया विक्र म रिक्षा आहेत. तसेच भ्रमंतीसाठी येणारे पर्यटक यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे वेळास-आदगाव रस्त्याच्या बाजूस असलेले खड्डे लवकर भरण्यात यावे व समुद्राच्या संरक्षक भिंतीची दुरु स्ती लवकर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
संरक्षक भिंतीस भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 2:14 AM