जेएसडब्ल्यूविरोधात आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:03 AM2018-03-20T02:03:13+5:302018-03-20T02:03:13+5:30

संरक्षक बंधारे फुटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि बंधाºयाची दुरुस्ती याकरिता २३ मे २०१७ पासून सतत पाठपुरावा करूनही दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत नाही.

A protest signal against JSW | जेएसडब्ल्यूविरोधात आंदोलनाचा इशारा

जेएसडब्ल्यूविरोधात आंदोलनाचा इशारा

googlenewsNext

अलिबाग : संरक्षक बंधारे फुटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि बंधाºयाची दुरुस्ती याकरिता २३ मे २०१७ पासून सतत पाठपुरावा करूनही दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत नाही. या संदर्भातील बैठकीसाठी शेतकºयांना शनिवारी पेण उप विभागीय कार्यालयात रात्री आठ वाजेपर्यंत रखडावे लागले. यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी पसरली असून आनंदनगर ते गडबपर्यंतच्या अकरा गावांतील शेतकºयांनी उग्र आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीवर शेतकरी महिलांचा
लाटणी मोर्चा व पेण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतलेला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी दिली आहे.
पेण तालुक्यातील कासू परिसरातील जुईअब्बास व मार्चेला चिर्बी खारभूमी योजनेच्या अंतर्गत येणाºया संरक्षक बंधाºयाला ढोंबी व माचेला गावाजवळ ३ ते ४ ठिकाणी उधाणाच्या भरतीमुळे मोठी भगदाडे(खांडी) पडली आहेत. गडब ते देवळी या गावांपर्यंत २३०० एकर भातशेती क्षेत्रात खारे पाणी शिरले असून दोन हजारच्या वर कुटुंबांच्या उपजीविकेलाच मोठा फटका बसला आहे. या संदर्भात गतवर्षी २३ मे २०१७ पासून शेतकरी शिष्टमंडळ, उपोषण, शेतात घुसलेले खारे पाणी पाहण्यासाठी अधिकारी, आमदार धैर्यशील पाटील यांचा दौरा, विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झालेला प्रश्न व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जिल्हाधिकाºयांना याबाबत केलेली विचारणा इतके सारे होऊनही जिल्हा प्रशासन हरित न्यायाधीकरणाचे कारण देत हतबलता दाखवित आहे. परिणामी बांध दुरुस्तीचा प्रश्न अजूनही रेंगाळत पडलेला असल्याने बाधित शेतकºयांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असल्याची माहिती शिवकर यांनी दिली आहे.
याच समस्येच्या संदर्भात गेल्या १६ फेब्रुवारी रोजी पेण उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी बैठक बोलावली होती, मात्र त्याचे लेखी पत्र शेतकºयांना दिले नव्हते. या सभेला जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने उपमहाव्यवस्थापक अरु ण शिर्के, खारभूमी विभागाचे शाखा अभियंता सुभाष निंबाळकर व २५ शेतकरी प्रतिनिधी हजर होते. यावेळी शेतकºयांनी गट नं. ९४ मधील न्यायप्रविष्ट बाब टाळून नवीन ठिकाणाहून खांडीपर्यंत पोचण्याचा मार्ग सुचविला होता. त्यावेळी शिर्के यांनी बांधाच्या रु ंदीबाबत शंका उपस्थित केली व या मार्गाचा पुन्हा फेरसर्व्हे करण्याबाबत सुचविले होते. त्याप्रमाणे १७ मार्च रोजी कंपनीचे अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांनी संयुक्तरीत्या सर्व्हे केला असता बांधाची रु ंदी ३ मीटर ते ६ मीटरपर्यंत आढळली.
कांदळवनाची कोणतीही झाडे बांधामध्ये येत नसून काही ठिकाणी खुरटी वनस्पती आढळली त्यामुळे हाच मार्ग बंधाºयांच्या दुरुस्तीकरिता सोईस्कर ठरणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
१आता या संदर्भातील बैठक शासकीय कार्यालयात होण्याऐवजी कंपनीच्या कार्यालयात आयोजित करण्याच्या मुद्यावरून शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. बैठक कंपनीत नव्हे तर प्रांत कार्यालयातच झाली पाहिजे अशी भूमिका घेतली असून याबाबत योग्य निर्णय न झाल्यास कंपनीवर महिला शेतकºयांचा लाटणी मोर्चा व पेण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतलेला आहे.
२याबाबत राज्यपालांना शेतकरी शिष्टमंडळाद्वारे भेटण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. २३०० एकरात खारे पाणी शिरले त्यावेळी शासकीय पंचनामा झाला असून एप्रिल महिन्यापर्यंत संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केली नाही तर पुढे शेतीची कामे करताच येणार नाहीत त्यामुळे एकरी ३० हजार रु पयेप्रमाणे शासनाने नुकसान भरपाई दिलीच पाहिजे, अशीही मागणी शेतकºयांची असल्याचे शिवकर यांनी सांगितले.

जेएसडब्ल्यू कंपनीने संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीकरिता ६० लाख रुपयांची तरतूद यापूर्वीच केली आहे. केवळ या दुरुस्ती कामाकरिता त्या बंधाºयापर्यंत पोहोचण्याकरिता शेतकºयांनी सुचविलेला मार्ग अरुंद असल्याने त्यावरून माल घेवून वाहन जावू शकत नाही. कंपनीची जागा आणि संबंधित बंधारा यामध्ये असलेल्या नाल्यामध्ये तात्पुरते पाइप टाकून तात्पुरता रस्ता करून बंधाºयाचे काम करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाºयांकडे परवानगी मागितली आहे. ती मिळताच हे दुरुस्तीचे काम करण्यात येईल.
- अरुण शिर्के, उपमहाव्यवस्थापक,
जेएसडब्ल्यू कंपनी

Web Title: A protest signal against JSW

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड