शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

जेएसडब्ल्यूविरोधात आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 2:03 AM

संरक्षक बंधारे फुटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि बंधाºयाची दुरुस्ती याकरिता २३ मे २०१७ पासून सतत पाठपुरावा करूनही दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत नाही.

अलिबाग : संरक्षक बंधारे फुटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि बंधाºयाची दुरुस्ती याकरिता २३ मे २०१७ पासून सतत पाठपुरावा करूनही दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत नाही. या संदर्भातील बैठकीसाठी शेतकºयांना शनिवारी पेण उप विभागीय कार्यालयात रात्री आठ वाजेपर्यंत रखडावे लागले. यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी पसरली असून आनंदनगर ते गडबपर्यंतच्या अकरा गावांतील शेतकºयांनी उग्र आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीवर शेतकरी महिलांचालाटणी मोर्चा व पेण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतलेला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी दिली आहे.पेण तालुक्यातील कासू परिसरातील जुईअब्बास व मार्चेला चिर्बी खारभूमी योजनेच्या अंतर्गत येणाºया संरक्षक बंधाºयाला ढोंबी व माचेला गावाजवळ ३ ते ४ ठिकाणी उधाणाच्या भरतीमुळे मोठी भगदाडे(खांडी) पडली आहेत. गडब ते देवळी या गावांपर्यंत २३०० एकर भातशेती क्षेत्रात खारे पाणी शिरले असून दोन हजारच्या वर कुटुंबांच्या उपजीविकेलाच मोठा फटका बसला आहे. या संदर्भात गतवर्षी २३ मे २०१७ पासून शेतकरी शिष्टमंडळ, उपोषण, शेतात घुसलेले खारे पाणी पाहण्यासाठी अधिकारी, आमदार धैर्यशील पाटील यांचा दौरा, विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झालेला प्रश्न व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जिल्हाधिकाºयांना याबाबत केलेली विचारणा इतके सारे होऊनही जिल्हा प्रशासन हरित न्यायाधीकरणाचे कारण देत हतबलता दाखवित आहे. परिणामी बांध दुरुस्तीचा प्रश्न अजूनही रेंगाळत पडलेला असल्याने बाधित शेतकºयांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असल्याची माहिती शिवकर यांनी दिली आहे.याच समस्येच्या संदर्भात गेल्या १६ फेब्रुवारी रोजी पेण उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी बैठक बोलावली होती, मात्र त्याचे लेखी पत्र शेतकºयांना दिले नव्हते. या सभेला जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने उपमहाव्यवस्थापक अरु ण शिर्के, खारभूमी विभागाचे शाखा अभियंता सुभाष निंबाळकर व २५ शेतकरी प्रतिनिधी हजर होते. यावेळी शेतकºयांनी गट नं. ९४ मधील न्यायप्रविष्ट बाब टाळून नवीन ठिकाणाहून खांडीपर्यंत पोचण्याचा मार्ग सुचविला होता. त्यावेळी शिर्के यांनी बांधाच्या रु ंदीबाबत शंका उपस्थित केली व या मार्गाचा पुन्हा फेरसर्व्हे करण्याबाबत सुचविले होते. त्याप्रमाणे १७ मार्च रोजी कंपनीचे अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांनी संयुक्तरीत्या सर्व्हे केला असता बांधाची रु ंदी ३ मीटर ते ६ मीटरपर्यंत आढळली.कांदळवनाची कोणतीही झाडे बांधामध्ये येत नसून काही ठिकाणी खुरटी वनस्पती आढळली त्यामुळे हाच मार्ग बंधाºयांच्या दुरुस्तीकरिता सोईस्कर ठरणार असल्याचे स्पष्ट झाले होते.शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात१आता या संदर्भातील बैठक शासकीय कार्यालयात होण्याऐवजी कंपनीच्या कार्यालयात आयोजित करण्याच्या मुद्यावरून शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. बैठक कंपनीत नव्हे तर प्रांत कार्यालयातच झाली पाहिजे अशी भूमिका घेतली असून याबाबत योग्य निर्णय न झाल्यास कंपनीवर महिला शेतकºयांचा लाटणी मोर्चा व पेण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतलेला आहे.२याबाबत राज्यपालांना शेतकरी शिष्टमंडळाद्वारे भेटण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. २३०० एकरात खारे पाणी शिरले त्यावेळी शासकीय पंचनामा झाला असून एप्रिल महिन्यापर्यंत संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केली नाही तर पुढे शेतीची कामे करताच येणार नाहीत त्यामुळे एकरी ३० हजार रु पयेप्रमाणे शासनाने नुकसान भरपाई दिलीच पाहिजे, अशीही मागणी शेतकºयांची असल्याचे शिवकर यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू कंपनीने संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीकरिता ६० लाख रुपयांची तरतूद यापूर्वीच केली आहे. केवळ या दुरुस्ती कामाकरिता त्या बंधाºयापर्यंत पोहोचण्याकरिता शेतकºयांनी सुचविलेला मार्ग अरुंद असल्याने त्यावरून माल घेवून वाहन जावू शकत नाही. कंपनीची जागा आणि संबंधित बंधारा यामध्ये असलेल्या नाल्यामध्ये तात्पुरते पाइप टाकून तात्पुरता रस्ता करून बंधाºयाचे काम करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाºयांकडे परवानगी मागितली आहे. ती मिळताच हे दुरुस्तीचे काम करण्यात येईल.- अरुण शिर्के, उपमहाव्यवस्थापक,जेएसडब्ल्यू कंपनी

टॅग्स :Raigadरायगड