कळंबोली सर्कल जवळ अवजड वाहन चालकांची निदर्शने; महामार्ग रोखून धरला
By वैभव गायकर | Published: January 1, 2024 01:10 PM2024-01-01T13:10:39+5:302024-01-01T13:10:54+5:30
वाहनांच्या चाव्या काढून वाहन चालक रस्त्यावर उतरले होते.कळंबोली,पनवेल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना बाजूला सारले.
पनवेल:वाहन चालकांसाठी नवीन नियमाची अंमलबजावणी दि.1 पासून सुरु होत असल्याने अवजड वाहन चालकांनी सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल वर निदर्शन केली .
अपघात झाल्यास ट्रक ड्रायव्हरला 10 वर्षांची सजा व 7 लाख रुपये जुरमाना या जुलमी कायद्या विरोधात ट्रक चालक रस्त्यावर उतरलेत आहेत. सकाळी 11 पासून या निदर्शनात सुरुवात केल्याने रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती.सकाळी कामावर जाणा-नागरिकांना याचा फटका बसला.कळंबोली बिमा कॉप्लेक्स जवळ देखील रस्ते यावेळी जाम केले होते. वाहनांच्या चाव्या काढून वाहन चालक रस्त्यावर उतरले होते.कळंबोली,पनवेल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना बाजूला सारले.
कळंबोळी: केंद्र सरकारने बनवलेल्या ड्रायव्हरविरोधी कायद्यासाठी ट्रक चालकांचा रास्ता रोको, रस्ते जाम. https://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/Dv41lRULWB
— Lokmat (@lokmat) January 1, 2024