अलिबाग : महाडच्या चवदार तळे परिसर विकास आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डिसेंबरपूर्वी अनुदान उपलब्ध करून दिले जाईल, असे गृहनिर्माणमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी गुरुवारी मंत्रालयात सांगितले.महाडच्या चवदार तळे विकास आणि सोयी-सुविधांसंदर्भात कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत ही बैठक मंत्रालयात झाली. या वेळी वीर रेल्वे स्टेशन ते क्रांतिभूमीपर्यंत एसटी सेवा सुरू करणे, आंबेडकरी अनुयायांना आरोग्य सुविधा देणे, वीज,पाणी निवाऱ्याची सोय करणे, तळ्याचे सुशोभीकरण करणे, भोजन व्यवस्था, भीमसृष्टी निर्माण करण्यास गती देणे, माता रमाई आंबेडकर विहार, तसेच छत्रपती शाहू सभागृहाची दुरु स्ती करणे, अशा विविध कामांसंदर्भात एक विस्तृत निवेदन महेता यांना देण्यात आले.चवदार तळ्याच्या संपूर्ण विकासासाठी व अनुयायांना सोयी-सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन निधी, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे महेता यांनी शिष्टमंडळाला सांगितले. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
महाडच्या चवदार तळे विकासासाठी अनुदान देणार
By admin | Published: March 31, 2017 6:20 AM