पं. समितीत काळ्या फिती लावून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:02 AM2017-08-03T02:02:10+5:302017-08-03T02:02:10+5:30

कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कर्मचाºयाने कामाचा अती ताण आणि कमी वेळेत अपेक्षित काम पूर्ण करण्याची वरिष्ठांची अपेक्षा यामुळे बाळकृष्ण गुरव यांनी आपले जीवन संपविले.

Pt Taking the black ribbons in the committee | पं. समितीत काळ्या फिती लावून कामकाज

पं. समितीत काळ्या फिती लावून कामकाज

Next

अलिबाग : कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कर्मचाºयाने कामाचा अती ताण आणि कमी वेळेत अपेक्षित काम पूर्ण करण्याची वरिष्ठांची अपेक्षा यामुळे बाळकृष्ण गुरव यांनी आपले जीवन संपविले. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, मित्र संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कार्यालयात काळ्या फिती लावून कामकाज के ले.
पुणे विभागामध्ये सध्या झीरो पेंन्डसी व अभिलेख वर्गीकरण मोहीम विभागीय आयुक्त पुणे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आली आहे. ही मोहीम ३१ जुलै २०१७ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना कर्मचाºयांना देण्यात आल्या होत्या. अभिलेख वर्गीकरण हे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कागदपत्रांचा निंदणीकरण, नाशीकरण आणि वर्गीकरण हे किचकट व वेळखाऊ कामकाज आहे. या महत्त्वाच्या कामासाठी दिलेली मुदत ही कमी कालावधीची होती. त्यामुळे पुणे विभागातील जिल्हा परिषदेतील कर्मचारी तणावाखाली असल्याचे बोलले जाते. कामाच्या अती तणावामुळे व कमी कालावधीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण गुरव यांनी ३१ जुलै रोजी विष प्राशन करु न नदीत उडी घेतली. त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने उपचारादम्यान त्यांचा मृत्यू
झाला.
या घटनेचा निषेध करीत, झालेल्या प्रकाराची न्यायिक चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांनी सकाळपासूनच काळ्या फिती लावून कामकाजास सुरु वात केल्याचे दिसून आले.

Web Title: Pt Taking the black ribbons in the committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.