मोहोपाडा : ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या मागण्यांचा गेल्या बजेटमध्ये कुठलाही विचार झाला नाही. साठीच्या वरचे ३० लाख पेन्शनर्स आजही मासिक १००० रुपयांपेक्षाही कमी पेन्शनमध्ये जीवन जगत आहेत. त्याचप्रमाणे ३० लाख वृद्धांना दोन वर्षांच्या वेटेजच्या सुविधेपासून वंचित ठेवले आहे. सरकार सत्तेत आल्यास ९० दिवसांत लागू करू, असे आश्वासन देऊनही आजपर्यंत तीन वर्षांत हे आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे भारतातील ५४ लाख पेन्शनधारक हलाखीचे जीवन जगत आहेत.पेन्शनधारकांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, याकरिता कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी २० मार्चला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रायगड जिल्ह्यातील शेकडो पेन्शनर्स सहभागी झाले होते. प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रायगड पेन्शनर्स संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी बामणे यांनी दिला आहे. (वार्ताहर)
ईपीएस ९५ पेन्शनरांचे जनआंदोलन
By admin | Published: March 25, 2017 1:28 AM