सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती : रस्त्यांसाठी १४६ कोटी ९३ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 03:30 AM2018-12-22T03:30:17+5:302018-12-22T03:30:56+5:30
कर्जत-खालापूर तालुक्यात शहरीकरण वाढत आहे. तालुक्यातील रस्ते सुस्थितीत राहावे यासाठी शासन प्रयत्न करत असून, त्यासाठी १४६ कोटी ९३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कर्जत : कर्जत-खालापूर तालुक्यात शहरीकरण वाढत आहे. तालुक्यातील रस्ते सुस्थितीत राहावे यासाठी शासन प्रयत्न करत असून, त्यासाठी १४६ कोटी ९३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली असून, ही कामे २०१९ अखेरपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या रस्त्याची अवस्था खड्ड्यांमुळे दयनीय झाली आहे. याच्या निषेधार्थ विविध व्हॉट्सअॅप ग्रुप व नागरिक आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर अजयकुमार सर्वगोड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला असून कामे सुरू झाली आहेत, तरीही आंदोलन करून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. हे चुकीचे असून त्याचा परिणाम माथेरान येथील पर्यटनावर होत आहे. आंदोलन करणाºयांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले असता ते येत नाही. त्यामुळे प्रशासनाला जाणूनबुजून वेठीस धरण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत असल्याचे सर्वगोड यांनी स्पष्ट केले.
कर्जत तालुक्यातील मंजूर कामे
मुरबाड ते खोपोली (हाळ) हा रस्ता कर्जत तालुक्यातून जात असून, राष्टÑीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याचे काम महाराष्ट्र स्टेट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून सुरू आहे. कर्जत-चौक रस्त्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी पाच कोटी ९५ लाखांचा निधी, कर्जत डोणे रस्त्याचे दहा वर्षांसाठी देखभाल
दुरु स्ती काम व रस्ता तयार करण्यासाठी ४० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, काम सुरू झाले आहे.
राज्य महामार्ग ७६ ते उकृळ-चांदई-कडाव रस्त्यावरील पूल रुंदीकरणासाठी चार कोटी, दहीवली ते छोटे वेनगाव, मोठे चांधई, कडाव येथील गावातील रस्ते वारंवार खराब होतात, त्या ठिकाणी
काँक्र ीटीकरणासाठी आठ कोटी ४२ लाख, नेरळ-कशेळे रस्त्यासाठी एक कोटी ९० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. यावर १०० मीटरचे काँक्र ीटीकरण करण्यात येणार आहे.
कशेळे-खांडस गणपती घाट रस्त्यासाठी तीन कोटी निधी उपलब्ध झाला असून त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कोठिंबे-जांबरुंग रस्त्यासाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नेरळ-कळंब रस्त्यासाठी तीन कोटी ३० लाख रुपये, कर्जत येथील आदिवासीवाडी जोड कार्यक्र मासाठी सहा कोटी २० लाख रु पये निधी मंजूर, शेलू-निकोप गावादरम्यान असणाºया उल्हासनदीवरील पुलासाठी चार कोटी ९४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
खालापूर तालुक्यातील मंजूर कामे
सावरोली-खारपाडा रस्त्यासाठी
40 कोटी निधी उपलब्ध झाला असून, काम पी.पी. खारपाटील यांना देण्यात आले आहे. रस्ता पुढील दहा वर्षे खड्डेमुक्त होणार आहे.
खालापूर तालुक्यातील चौक येथील ब्रिटिश कालीन पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी तीन कोटी 60 लाख
रु पयांचा निधी.
चौक अंतर्गत रस्ता रुं दीकरण व काँक्रीटसाठी चार कोटी ८० लाखांचा निधी उपलब्ध, साजगाव-ढेकू-अत्करगाव-आडोशी इंडस्ट्रियल भागातील रस्ते काँक्र ीट साठी सात कोटी 94 लाखांचा निधी उपलब्ध असून काम सुरू आहे.
खालापूर तालुक्यातील आदिवासी जोड रस्त्यासाठी दोन कोटी 90 लाख रु पये निधी मंजूर असून, मार्च अखेरपर्यंत कामे पूर्ण करून घेण्यात येणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्जत कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाºया दोन्ही तालुक्यांतील रस्त्याच्या अवस्थेबाबतचा अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला होता, त्यानुसार निधी उपलब्ध झाला आहे. कामाच्या वर्कआॅर्डरही आल्या असून कामे सुरू आहेत, तर काही लवकरच सुरू होतील. हे काम एका दिवसात होणारे नसून त्यास थोडा कालावधी लागेल, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.
- अजयकुमार सर्वगोड, उपविभागीय अभियंता,
सार्वजनिक बांधकाम उपविभाग