पर्यटकांच्या माहितीसाठी मोबाइल अॅप, ‘रायगड ई-बुक’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 03:12 AM2019-01-09T03:12:00+5:302019-01-09T03:12:45+5:30
जिल्हा नियोजन समितीचा निधी : ‘रायगड ई-बुक’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची समग्र माहिती पर्यटकांना उपलब्ध व्हावी, यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रायगड जिल्हा माहिती कार्यालय यांनी तयार केलेल्या ‘रायगड पर्यटन विविधा’, या ई-बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले, तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाºया मोबाइल अॅपचेही उद्घाटन या वेळी करण्यात आले.
मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती सभागृहात हा कार्यक्र म पार पडला. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे ई-पुस्तक ६६६.१ं्रँ३िङ्म४१्र२े.ूङ्मे येथे तसेच मराठी ई-पुस्तकांच्या सर्व दालनांवर उपलब्ध असेल. तसेच रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळ ६६६.१ं्रँ.िल्ल्रू.्रल्ल येथेही या ई-बुकची लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. तर मोबाइल अॅपमध्ये पर्यटनस्थळे, निवास, भोजन सुविधा, मार्ग, नकाशे, वाहन सुविधा आदीबाबत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात येणाºया पर्यटकांचे पर्यटन सुकर होण्यास मदत होणार आहे. या पुस्तकात रायगड जिल्ह्यातील लेणी, गड-किल्ले, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे, साहसी पर्यटन, धबधबे आदी समग्र पर्यटनस्थळांची सविस्तर माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जगभरातील मराठी वाचकांना रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती पोहोचविणाºया या उपक्र माचे कौतुक केले.