शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

'भांडवलधार्जिण्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:22 AM

आशिया खंडात खतनिर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या थळ-अलिबाग येथील प्रकल्पाचा खासगीकरण करण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे.

अलिबाग : आशिया खंडात खतनिर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या थळ-अलिबाग येथील प्रकल्पाचा खासगीकरण करण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे. खासगीकरणाच्या नावाखाली हाच प्रकल्प अंबानीसारख्या भांडवलदाराच्या घशात घालण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केल्याचा गौप्यस्फोट शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केला. भांडवलधार्जिण्या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा आणि आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहनही त्यांनी केले.अलिबाग विधानसभा मतदारसंघात सोमवारी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी रामराज, नागाव, अलिबाग-खडताळपूल, धोकवडे, फोपेरी, वेश्वी आणि कुसुंबळे येथे विविध प्रचार सभांचा कार्यक्रम होता. वेश्वी येथील सभेत आमदार पाटील बोलत होते.भाजपचे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर देशाचे संविधान बदलून देशाचे तुकडे पाडले जातील. त्यामुळे मोदी सरकारला सत्तेपासून रोखले पाहिजे. यासाठीच आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे, असे आवाहनही पाटील यांनी केले.आरसीएफच्या प्रकल्पाचे खासगीकरण करून तो प्रकल्प अंबानींच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळेच थळ प्रकल्पाचे टप्पा तीनमधील विस्तारीकरण भाजप सरकारने जाणूनबुजून रखडवले आहे. त्यामुळे १४१ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न बिकट झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला अतिशय मजबूत असे संविधान दिले आहे. संविधानामुळे सर्व जातींना अधिकार मिळाले आहेत. तेच संविधान बदलून बहुजन समाजाचा शिक्षणाचा हक्क काढण्यासाठी अनुदानित शाळा बंद करण्याची तयारी भाजप सरकारने केली आहे असेही पाटील यांनी स्पष्ट करून तटकरे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

शिक्षणाचे खासगीकरण करून बहुजनांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेणाºया भाजप सरकारला जनतेने धडा शिकवावा.आरसीएफच्या खासगीकरणाचा डाव लवकरच उलटून टाकू आणि टप्पा क्रमांक-३ चे काम सुरू करून त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.>आरसीएफ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवणारभाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी निवडून आणले पाहिजे. तसेच झाले तरच देशाचे संविधान आणि देश वाचेल, असे आवाहन आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केले. निवडून आल्यावर सर्वप्रथम आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यात येईल असे आश्वासनही तटकरे यांनी दिले.रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचेही काम मार्गी लावण्यात येणार आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर टोल बसवण्यात येणार असल्याचे मध्यंतरी गीते यांनी म्हटले होते. टोलमुक्तीचा नारा यांनीच दिला होता आणि तेच आता जनतेच्या माथी टोल मारत आहेत. मात्र निवडून येताच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द केला जाईल असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरे