पेण : पेण-पनवेल शटल सेवा सुरू झाल्यानंतर आणि काही दिवसांपूर्वी रोहा-पनवेल शटल सेवेचे उद्घाटन नुकतेच झाले, त्यानंतर आता लवकरच अलिबाग- पनवेल शटल सेवा सुरू होणार असल्याची घोषणा झाल्याने पेण रेल्वेस्थानकाला मध्यवर्ती ठिकाण म्हणून महत्त्व प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने रेल्वे अधिकाºयांनी पेण रेल्वेस्थानकात रेल्वेची पुढील गतिमानता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी रेल्वे रु ळाची चाचणी केली. या वेळी मी पेणकर समितीने त्यांचे जंगी स्वागत करून आपल्या इतर मागण्यांचे पत्र अधिकाºयांना दिले.या वेळी रेल्वेचे व्यवस्थापकीय अधिकारी डी. के. शर्मा यांनी पनवेल-रोहा हे मार्ग रेल्वेसाठी महत्त्वाचे असून, रोहापर्यंत रेल्वेचे विद्युतीकरण झाल्याने रोहापर्यंत शटल सेवा सुरू केली जाईल, असे सांगून पेणकर समितीने केलेल्या मागणीप्रमाणे आम्ही अधिकाधिक गाड्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच त्यांनी केलेल्या इतर मागण्यांचादेखील सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले. या वेळी डी. के. शर्मा यांच्या हस्ते ड्रायव्हर ए.सी. रूम, इलेक्ट्रिकल डी.पी. व रेल्वे स्थानकातील पाणीपुरवठा आदीचे उद्घाटन करण्यात आले.पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत पथनाट्य सादर करून ‘स्वच्छ पेण सुंदर पेण’चा नारा दिला. मध्य रेल्वे मंडळ सांस्कृतिक अकादमी, मध्य रेल्वे मुंबई मंडळाच्या वतीने कोकणातील प्रसिद्ध बाल्या नृत्य सादरीकरणाने रेल्वे अधिकाºयांचे स्वागत करण्यात आले. कोकणाची लोकभाषा सांस्कृतिक नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमातून एक मोठा संदेश दिला गेला असून, अधिकाºयांना येथील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून आनंद झाला. या वेळी रेल्वेचे व्यवस्थापकीय अधिकारी डी. के. शर्मा, डीआरएम एस. के. जैन, आर. एस. गुप्ता, एल. एन. ठाकूर, शिरीष कांबळे यांसह मी पेणकर समितीचे संस्थापकीय अध्यक्ष योगेश म्हात्रे, कार्याध्यक्ष विजय पाटील आदी उपस्थित होते.>आपटा हरित रेल्वेस्थानकात चाचणीरसायनी : रेल्वेच्या कोकण मार्गावरील आपटा या हरित स्थानकातील रेल्वे रु ळाची चाचणी मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी मंगळवारी केली. यावेळी स्थानकाची रंगरंगोटी करून स्वच्छता केली होती.स्पेशल निरीक्षण ट्रेनमधून व्यवस्थापक व इतर अधिकारी आले. स्थानकप्रमुख प्रकाशचंद कुमार उपस्थित होते. स्थानकाच्या इमारतीवर सौरपॅनल बसविले आहेत. स्थानकात पंखे, एलईडी दिवे, सोलर वॉटर कुलर बसविले आहेत, ते सौरऊर्जेवर चालणार आहेत. नवीन स्वच्छतागृह बांधले आहेत.पेणकर समितीच्या अनेक आंदोलनानंतर पेणला शटल सेवा उपलब्ध झाली असली, तरी अजूनपर्यंत पेणकर समितीच्या मागण्यांपैकी जलद गाड्यांना थांबा मिळालेला नाही. शटल सेवेतील सकाळी ७.३० ची पेण-पनवेल गाडी पेणमधूनच कायमस्वरूपी सुटावी, शनिवार-रविवारही शटल सेवा सुरू राहावी ही पेणकरांची मागणी आहे. त्यानुसार पेणकरांसाठी आणखी काही शटल गाड्या वाढविण्यात याव्यात, या महत्त्वाच्या मागण्यांसह इतर काही मागण्यांचे पत्र ‘मी पेणकर’ समितीच्या वतीने रेल्वे अधिकाºयांना देण्यात आले. या वेळी पेणकर समितीच्या उपाध्यक्ष मोहिनी गोरे यांनी त्या मागण्या वाचून दाखविल्या.
अधिकाऱ्यांकडून पेण रेल्वेरुळाची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:00 AM