खोपोली बाजारपेठेत नियम मोडणाऱ्यांंविरोधात दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 11:06 PM2021-04-25T23:06:36+5:302021-04-25T23:06:36+5:30

मुख्याधिकारी गणेश शेटे उतरले रस्त्यावर

Punitive action against violators in Khopoli market | खोपोली बाजारपेठेत नियम मोडणाऱ्यांंविरोधात दंडात्मक कारवाई

खोपोली बाजारपेठेत नियम मोडणाऱ्यांंविरोधात दंडात्मक कारवाई

googlenewsNext

वावोशी: खोपोली शहरातील अत्यावश्यक आस्थापनांना सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी दिली असून या कालावधीत विक्रेत्यांकडून नियमांची अंमलबजावणी होते की नाही यासंबंधीची महिती घेण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी आरोग्य विभाग, कर्मचाऱ्यांंचा फौजफाटा बरोबर घेत बाजारपेठ आणि भाजी मंडईत अचानक भेट देऊन विक्रेत्यांची शारीरिक तपासणी केली. तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी मास्क दंड वसुली टीमचे विठोबा म्हात्रे, विजय वाघमारे, प्रदीप गायकवाड ,गुणाजी गायकवाड,हेमंत खैरे,अक्षय वाणी, नितीन ढोले तसेच पालिका रूग्णालयातील वंदना पाटील सिस्टर,स्वप्निल देशमुख, समीर लिमये यांंच्या फौजफाट्या समवेत बाजारपेठेत अचानक भेट देऊन विक्रेत्यांचे ऑक्सिजन आणि तापमान तपासणी केली . खोपोली शहरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून नागरिकांनी तसेच सर्व आस्थापना विक्रेत्यांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका, असे आवाहन गणेश शेटेयांनी केले.

Web Title: Punitive action against violators in Khopoli market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड