विनोद भोईरपाली : जेवणाची हाल होत आहेत... आमच्या जवळचे पैसे संपले...अजून किती दिवस रेड झोनमधील लॉकडाउन चालेल हे निश्चित नसल्याने आम्ही पायी जाण्याचा निर्णय घेतला. आम्हांला कुठेही ठेवले तरी चालेल फक्त जेवण द्या... आम्ही राहायला तयार आहोत, नाहीतर आम्हांला जाऊ द्या... अशी कळकळीची विनंती सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा हद्दीत करचुंडे येथील तपासणी नाक्यावर पकडलेल्या तरुणांनी केली. पोटाची खळगी भरण्यासाठी आपले गाव सोडून आलेल्या अनेक तरु णांची, कु टुंबाची अशी आवस्था आहे. जंगलाची वाट तुडवत, जीवाची पर्वान करता हे ११ तरु ण सोमवारी रात्री ८ वाजता नेरळ, कर्जत, खोपोली, घोटावडे असा रात्रभर जंगलमार्गे व काही ठिकाणी रस्त्याच्यामार्गे प्रवास करत सकाळी १० वाजण्याच्या सुमारास करचुंडेमार्गे रत्नागिरी व सिंधुदुर्गकडे निघाले होते.रेड झोनमधील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याची चर्चा सर्वत्र होत असतांना नोकरी निमित्ताने आपल्या घरापासून शहरात जाऊन राहिलेला तरुण मोठ्या प्रमाणात आता आपल्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. बुधवारी सकाळी सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा हद्दीत करचुंडे येथील तपासणी नाक्यावर कार्यरत असणारे शिक्षक वेत्रवान गुरव, दत्ता सावंत व शरद निकुंभ यांनी या ११ पायी चालणाºया तरुणांना अडवून चौकशी केली असता ते नेरळ कर्जत, खोपोली मार्गे जंगलातून वाट काढत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पायी जात असल्याचे समोर आले.जंगलातून आपले सामान सोबत घेऊन चालत थकलेल्या तरुणांना घाबरून न जाण्याचे सांगून त्यांना सावलीत बसवले व रास्तभाव दुकानदार विशाल गुरव व मयुर गुरव यांनी तातडीने त्यांना पाणी व नाष्ट्याची सोय केली. यामुळे यातरु णांना दिलासा मिळाला आणि जेवण मिळाले.>सर्वांना के ले क्वारंटाइनसुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर यांना तातडीने ही माहिती देण्यात आली त्यांनी या सर्वांना क्वारंटाइन करण्यासंबंधी भूमिका घेतली व तसे आदेश देण्यात आले. या वेळी जांभूळपाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.हे ११ तरुण रात्रभर जंगलमार्गे पायी प्रवास करत जीवाची काळजी न करता घराच्या ओढीने निघाले. त्यांना नशिबाने साथ दिली म्हणावे लागेल.
आम्हाला कुठेही ठेवा, फक्त जेवण द्या, मोलमजुरी करणाऱ्या तरुणांची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 2:06 AM