- जयंत धुळपअलिबाग : ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम करून बांधण्यात आलेला १८७ मीटर लांबीचा, गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-बिरवाडी दरम्यानचा सावित्री नदीवर ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम केलेला पूल, गतवर्षी २ आॅगस्टला रात्री कोसळला आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. याच गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते पोलादपूर या टप्प्यात १६ ब्रिटिशकालीन दगडी पूल आजही सुरू आहेत. मात्र, हे पूल वाहतुकीकरिता सुरक्षित आहेत किंवा नाही, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आजतागायत कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे या महामार्गावरील १५ ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेबाबत आजही प्रश्नचिन्ह कायम आहे.येत्या २१ ते २४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत मुंर्बतून २००० एसटी बसेसच्या माध्यमातून किमान एक लाख, सुमारे ८०० खासगी बसेसच्या माध्यमातून किमान ४० हजार आणि सुमारे १५ हजार स्वमालकीच्या खासगी चारचाकी वाहनांतून किमान ७५ हजार, असे एकूण सुमारे २ लाख १५ हजार कोकणवासीय याच १६ ब्रिटिशकालीन पुलांवरून कोकणात आपापल्या गावी जाणार आहेत.गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या या अत्यंत गभीर आणि धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई-गोवा महामार्ग व इतर प्रमुख रस्त्यांवरील खड्डे व धोकादायक पुलांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात घेतलेल्या विशेष बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या मलमपट्ट्यांचे अनेक मुद्दे समोर आले.अपघातप्रवण ठिकाणी, तसेच धोकादायक पुलाच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक तत्काळ लावण्यात यावेत, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महामार्गाशेजारील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव व संपर्क क्रमांकाची माहिती असणारे फलक महामार्गावर लावावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मुंबई-गोवा महामार्गाची नियमित पाहणी करून, अपघातप्रवण ठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही स्पष्ट आदेश डॉ. सूर्यवंशी यांनी बैठकीतदिले.बैठकीला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पनवेलचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ सातपुते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण व पनवेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि गेल्या किमान १५ वर्षांपासून रायगड जिल्हा प्रशासनास आपतकालीन परिस्थितीत मदत व सहकार्य करणाºया जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.स्ट्रक्चरल आॅडिट’ रिपोर्ट नाही तरी १६ पूल धोकादायक नसल्याचा दावागतवर्षी सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातानंतर राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गावरील पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करून ते वाहतुकीस सुरक्षित आहेत वा धोकादायक आहेत, याबाबतचे अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या आदेशानुसार गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या १६ ब्रिटिशकालीन पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्याचे काम ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, मुंबई या कंपनीकडे देण्यात आले होते. त्यांनी ते केले आहे. मात्र, त्याचा अहवाल आमच्याकडे नाही, अशी माहिती यानिमित्ताने संपर्क साधला असता राष्ट्रीय महामार्ग पेण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. सुरवसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आणि हे १६ ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीस धोकादायक नसल्याचाही दावा केला आहे.गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक कोकणातील आपल्या गावी येत असल्याने वाहनांची प्रचंड मोठी संख्या गोवा राष्ट्रीय महामार्गावर असते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असते. परिणामी, अपघातप्रवण ठिकाणी तसेच धोकादायक पुलाच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक तत्काळ लावण्यात यावेत, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिले आहेत.- डॉ. विजय सूर्यवंशी,जिल्हाधिकारी, रायगड
ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह- जयंत धुळपअलिबाग : ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम करून बांधण्यात आलेला १८७ मीटर लांबीचा, गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-बिरवाडी दरम्यानचा सावित्री नदीवर ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम केलेला पूल, गतवर्षी २ आॅगस्टला रात्री कोसळला आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. याच गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते पोलादपूर या टप्प्यात १६ ब्रिटिशकालीन दगडी पूल आजही सुरू आहेत. मात्र, हे पूल वाहतुकीकरिता सुरक्षित आहेत किंवा नाही, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आजतागायत कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे या महामार्गावरील १५ ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेबाबत आजही प्रश्नचिन्ह कायम आहे.येत्या २१ ते २४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत मुंर्बतून २००० एसटी बसेसच्या माध्यमातून किमान एक लाख, सुमारे ८०० खासगी बसेसच्या माध्यमातून किमान ४० हजार आणि सुमारे १५ हजार स्वमालकीच्या खासगी चारचाकी वाहनांतून किमान ७५ हजार, असे एकूण सुमारे २ लाख १५ हजार कोकणवासीय याच १६ ब्रिटिशकालीन पुलांवरून कोकणात आपापल्या गावी जाणार आहेत.गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या या अत्यंत गभीर आणि धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई-गोवा महामार्ग व इतर प्रमुख रस्त्यांवरील खड्डे व धोकादायक पुलांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात घेतलेल्या विशेष बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या मलमपट्ट्यांचे अनेक मुद्दे समोर आले.अपघातप्रवण ठिकाणी, तसेच धोकादायक पुलाच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक तत्काळ लावण्यात यावेत, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महामार्गाशेजारील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव व संपर्क क्रमांकाची माहिती असणारे फलक महामार्गावर लावावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मुंबई-गोवा महामार्गाची नियमित पाहणी करून, अपघातप्रवण ठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही स्पष्ट आदेश डॉ. सूर्यवंशी यांनी बैठकीतदिले.बैठकीला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पनवेलचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ सातपुते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण व पनवेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि गेल्या किमान १५ वर्षांपासून रायगड जिल्हा प्रशासनास आपतकालीन परिस्थितीत मदत व सहकार्य करणाºया जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.स्ट्रक्चरल आॅडिट’ रिपोर्ट नाही तरी १६ पूल धोकादायक नसल्याचा दावागतवर्षी सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातानंतर राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गावरील पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करून ते वाहतुकीस सुरक्षित आहेत वा धोकादायक आहेत, याबाबतचे अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या आदेशानुसार गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या १६ ब्रिटिशकालीन पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्याचे काम ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, मुंबई या कंपनीकडे देण्यात आले होते. त्यांनी ते केले आहे. मात्र, त्याचा अहवाल आमच्याकडे नाही, अशी माहिती यानिमित्ताने संपर्क साधला असता राष्ट्रीय महामार्ग पेण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. सुरवसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आणि हे १६ ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीस धोकादायक नसल्याचाही दावा केला आहे.गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक कोकणातील आपल्या गावी येत असल्याने वाहनांची प्रचंड मोठी संख्या गोवा राष्ट्रीय महामार्गावर असते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असते. परिणामी, अपघातप्रवण ठिकाणी तसेच धोकादायक पुलाच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक तत्काळ लावण्यात यावेत, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिले आहेत.- डॉ. विजय सूर्यवंशी,जिल्हाधिकारी, रायगड