रायगडमध्ये बेरोजगारीचा प्रश्न कायम, साडेचार वर्षांमध्ये आश्वासनांची पूर्ती नाही।

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 04:42 AM2019-03-23T04:42:40+5:302019-03-23T05:02:47+5:30

रायगड लोकसभा मतदार संघातून २०१४ साली मतदारांनी शिवसेनेचे अनंत गीते यांना निवडून दिले होते. निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग विभागाचे मंत्रिपद गीते यांना मिळाले.

 The question of unemployment in Raigad remains stable, there is no fulfillment of promises in four and a half years. | रायगडमध्ये बेरोजगारीचा प्रश्न कायम, साडेचार वर्षांमध्ये आश्वासनांची पूर्ती नाही।

रायगडमध्ये बेरोजगारीचा प्रश्न कायम, साडेचार वर्षांमध्ये आश्वासनांची पूर्ती नाही।

googlenewsNext

- आविष्कार देसाई

अलिबाग - रायगड लोकसभा मतदार संघातून २०१४ साली मतदारांनी शिवसेनेचे अनंत गीते यांना निवडून दिले होते. निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग विभागाचे मंत्रिपद गीते यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगारी मोडीत काढण्यासाठी रायगड-रोहे तालुक्यातील चणेरा आणि रत्नागिरी-लोटे-परशुराम परिसरात दोन मोठ्या पेपर इंडस्ट्री स्थापन करण्याच्या घोषणा केल्या होत्या. तसेच अलिबागला रेल्वे आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, गेल्या साडेचार वर्षांमध्ये या दोन्हीही आश्वासनांची पूर्ती झाली नाही त्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.
भाजपा-शिवसेना युतीने २०१४ च्या निवडणुकीत भरमसाठ आश्वासने दिली होती. त्याचा विसर मतदारांना अद्यापही पडलेला नाही. त्यानंतर आता २०१९ च्या निवडणुकीसाठी नवीन घोषणा करून
मतदारांना प्रलोभनेदाखवली जात आहेत.
रायगड जिल्हा हा मुंबईच्या अगदी जवळ, तर रत्नागिरी जिल्हा हा कोल्हापूरच्या जवळ असणारे जिल्हे आहेत; परंतु म्हणावी तशी अद्याप दोन्ही जिल्ह्यांची प्रगती झालेली नाही. बेरोजगारी असल्याने तेथील तरुण आजही पोटापाण्यासाठी मुंबई, पुण्यात भटकंती करत आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील चणेरा आणि रत्नागिरीमधील लोटे-परशुराम परिसरात दोन मोठ्या पेपर इंडस्ट्रीज स्थापन करण्याच्या घोषणा केल्या होत्या. लोटे परशुराम येथे फक्त त्यांनी जागा बघितली आहे, तर रोहे तालुक्यातील चणेरा येथे जागेचा पत्ताच नाही. गेल्या साडेचार वर्षांत या दोन्ही ठिकाणी काहीच काम झाले नाही त्यामुळे याचा फटका त्यांना बसू शकतो.
याबाबत अनंत गीते यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

आरसीएफ कं पनीतील१४१ प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटला नाही

अलिबाग तालुका हा मुंबईला हाकेच्या अंतरावर आहे, असे असतानादेखील अलिबागमध्ये रेल्वे आलेली नाही. अलिबागला रेल्वे आणण्याचे आश्वासन गीते यांनी दिले होते. काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने रेल्वे आणण्यात अडचणी येत असल्याचे मध्यंतरी त्यांनी एका जाहीर सभेत सांगितले होते.

मात्र, कें द्रात आणि राज्यात सत्ता असूनही काम न झाल्याने नाराजी व्यक्त के ली जात आहे.अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीमधील १४१ प्रकल्प्रस्तांचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून भिजत पडलेला आहे. गीते यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी हातामध्ये घेतला होता. मात्र, त्यातही त्यांना यश आले नाही, यातील प्रकल्पग्रस्त आजही वाऱ्यावरच आहेत.

Web Title:  The question of unemployment in Raigad remains stable, there is no fulfillment of promises in four and a half years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.