रायगडमधील राेहा येथे सर्वाधिक १६१ मिमी पावसाची नाेंद
By admin | Published: June 28, 2017 02:40 PM2017-06-28T14:40:52+5:302017-06-28T14:40:52+5:30
बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १६१ मिमी पावसाची नाेंद राेहा येथे झाली आहे.
Next
>जयंत धुळप/ ऑनलाइन लाेकमत
रायगड, दि. 28 - बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १६१ मिमी पावसाची नाेंद राेहा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पेण-८०.२०, महाड-२९, पाेलादपूर-२४, पाली(सुधागड)-३५.६६, खालापूर-७४, कर्जत-७५.८०, अलिबाग-७४, तळा-८३, माणगांव-३२, उरण-११६, म्हसळा-३५.६०, मुरुड -४७, श्रीवर्धन-३०, पनवेल-१२५ आणि गिरिस्थान माथेरान येथे १८५ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. गेल्या २४ तासातील जिल्ह्याचे सरासरी पजर्न्यमान ७५.४५ मिमी आहे.
जिल्ह्यातील मुख्य सहा नद्यांची पातळी नियंत्रणात
जिल्ह्यातील सहा महत्त्वाच्या नद्यांची पातळी नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात, कुंडलिका नदी क्षेत्रात काेलाड येथे ९२ मिमी पाऊस झाला असून २३.९५ मीटर धाेका पातळी असलेल्या कुंडलिका नदीची जलपातळी २२.६० मीटर आहे. अंबा नदी क्षेत्रात उन्हेरे(सुधागड) येथे ४६ मिमी पाऊस झाला असून ९ मीटर धाेका पातळी असलेल्या अंबा नदीची जलपातळी ६.५५ मीटर आहे. सावित्री नदी क्षेत्रात महाड येथे २९ मिमी पाऊस झाला असून ६.५० मीटर धाेका पातळी असलेल्या सावित्री नदीची जलपातळी ३.३० मीटर आहे.
पाताळगंगा नदी क्षेत्रात खालापूर येथे ७४ मिमी पाऊस झाला असून २१.५२ मीटर धाेका पातळी असलेल्या पाताळगंगा नदीची जलपातळी १७.२० मीटर आहे. उल्हास नदी क्षेत्रात अवसरे येथे ७० मिमी पाऊस झाला असून ४८.७० मीटर धाेका पातळी असलेल्या उल्हास नदीची जलपातळी ४४ मीटर आहे. गाढी नदी क्षेत्रात माेरबे येथे ११० मिमी पाऊस झाला असून ६.५५ मीटर धाेका पातळी असलेल्या गाढी नदीची जलपातळी २.७० मीटर आहे.
भीरा धरण क्षेत्रात २४ तासात १०३ मिमी पाऊस
भीरा धरण क्षेत्रात आज सकाळी संपलेल्या २४ तासात १०३.४० मिमी पावसाची नाेंद झाली असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान १ जून २०१७ पासून या धरण क्षेत्रात एकूण ९४०.२० मिमी पाऊस झाला असल्याने धरणाच्या पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. ९.०९० दलघमी जलसंचय क्षमता असलेल्या भीरा धरणात, बुधवारी सकाळी जलपातळी ९४.२० मीटर झाली असून सद्यस्थितीत जलसाठा ५.१६ दलघमी आहे.