पनवेल : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ४५१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे, तर गुरुवारपर्यंत ८४ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला, तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने हे दिलासादायक चित्र आहे.सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा २९७, पनवेल ग्रामीण ८९, उरण १९, खालापूर ४, कर्जत १९, पेण २६, अलिबाग २७, मुरुड ४, माणगाव ६, रोहा २, म्हसळा ११, महाड ११ अशी एकूण ५२५ झाली आहे. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि प्रतिकारशक्तीच्या जोरावर बºया झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा ७८०, पनवेल ग्रामीण २४६, उरण १६७, खालापूर १०, कर्जत २६, पेण २१, अलिबाग ३८ मुरुड १३, माणगाव ५१, तळा १२, रोह २३, सुधागड २, श्रीवर्धन ९, म्हसळा १८, महाड १५ पोलादपूर २० अशी एकूण १ हजार ४५१ आहे.५,९६८ जणांची चाचणीआतापर्यंत जिल्ह्यातून ५ हजार ९६८ नागरिकांचे कोविड अहवाल मुंबई येथे तपासणीसाठी पाठविले असून, त्यापैकी ३ हजार ८६३ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, तर रिपोर्ट प्रलंबित असणाºया नागरिकांची संख्या ३८ आहे. २ हजार ६७ जण पॉझिटिव्ह आहेत.
CoronaVirus News: रायगडमध्ये १ हजार ४५१ जणांनी केली करोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:21 AM