- मधुकर ठाकूरउरण - मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेएनपीए बंदरातुन मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन मालवाहु कंटेनरमधुन १० कोटींहून अधिक किमतीचा विदेशी सिगारेटचा जप्त केला आहे. युईएमधुन जुन्या गालीच्यांच्या बनावट नावाखाली तस्करी मार्गाने ६७.२० सिगारेटचा साठा आयात करण्यात आला होता.
दोन संशयित कंटेनरची तपासणी केली असता पहिल्या कंटेनरमध्ये कोरियामध्ये बनवलेल्या " इजी चेंज " ब्रॅडच्या ६७.२० सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.दुसऱ्या कंटेनरमध्ये जुन्या आणि वापरलेल्या कार्पेटचे ३२५ रोल आढळून आले होते.हे गालीचेही जप्त करण्यात आले आहेत.या जुन्या वापरलेल्या कार्पेटचा वापर अधिकाऱ्यांना लुबाडण्यासाठी कव्हर कार्गो म्हणून केला जात होता अशी माहिती डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.या विदेशी ब्रॅडच्या सिगारेटची किंमत १० कोटी आठ लाख आहे.याप्रकरणी कस्टम क्लिअरिंग एजंटची चौकशी करण्यात येणार असून अधिक तपशील देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दर्शविला.