Raigad: चिटफंड घोटाळ्यातील एजंटच्या घरातून पैसे वसूल करण्याचा गुंतवणुकदारांचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 03:28 PM2023-07-16T15:28:20+5:302023-07-16T15:28:42+5:30

Raigad Crime News: उरणमधील शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळा प्रकरणी पैसे परत मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांनी संबंधित एजंटांच्या घरी जाऊन जबरदस्तीने पैसे वसूल करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी या परिसरात रविवारी (१६) १४४ कलम लागू केला आहे.

Raigad: | Raigad: चिटफंड घोटाळ्यातील एजंटच्या घरातून पैसे वसूल करण्याचा गुंतवणुकदारांचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

Raigad: चिटफंड घोटाळ्यातील एजंटच्या घरातून पैसे वसूल करण्याचा गुंतवणुकदारांचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

googlenewsNext

 - मधुकर ठाकूर 

उरण -  उरणमधील शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळा प्रकरणी पैसे परत मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांनी संबंधित एजंटांच्या घरी जाऊन जबरदस्तीने पैसे वसूल करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी या परिसरात रविवारी (१६) १४४ कलम लागू केला आहे. त्यासाठी कोप्रोली आणि पिरकोन दरम्यानच्या गावात बंदोबस्तासाठी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आल्याने गुंतवणूकदारांनी जाहीर केलेल्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.

उरणमधील शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळा प्रकरणी पिरकोन येथील सतीश गावंड आणि त्याच्या साथीदारांनी ५० दिवसांनी दुप्पटीने पैसे देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडुन शेकडो कोटी रुपयांची माया गोळा केली.मात्र गुंतवणूकदारांचे पैसे देण्याची वेळ येताच त्यांनी हात वर केले आहेत. गुंतवणुकदारांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सतीश गावंड आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. सतीश गावंडच्या अटकेमुळे एकत्रित आलेल्या गुंतवणूकदारांनी  न्यायालयाबाहेर काही काळ धिंगाणाही घातला होता.

आमचे पैसे सुरक्षित असल्याचा आवही काही गुंतवणूकदारांनी आणला होता.त्यामुळे सतीश गावंड जामीनावर बाहेर आल्यानंतर दुप्पटीने पैसे मिळतील अशी भाबडी आशा गुंतवणूकदारांना लागुन राहिली होती.चिटफंड प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या एजंटकडून पैसे परत करण्याच्या सातत्याने तारखा जाहीर करण्यात येत आहेत.मात्र पैसे सोडाच चिटफंड प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या एजंटची वारंवार पैसे परत करण्याच्या तारखा देत आहेत.मात्र दिलेल्या तारखांना गुंतवणूकदारांना छदामही मिळाला नाही.त्यामुळे पैसे परत करण्याच्या तारखांवर आता गुंतवणूकदारांचा विश्वास राहिलेला नाही.त्यामुळे एजंटांनी दिलेल्या १६ जुलै रोजी गुंतवणूकदारांनी कोप्रोली नाक्यावर उपस्थित राहून एजंटांच्या घरी जाऊन पैसे वसूल करण्याचे आवाहन विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर मॅसेजव्दारे करण्यात आले होते.

मात्र व्हॉट्सॲप ग्रुपवर मॅसेजव्दारे करण्यात आलेल्या आवाहनाला पोलिसांनी आक्षेप घेतला आहे.या आवाहनामुळे मोठ्या संख्येने एकत्र येणाऱ्या गुंतवणूकदारांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे.ज्या लोकांनी दुप्पटीच्या पैशांच्या  आमिषाने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.  पैसे परत न मिळाल्याने त्यांचे याआधीच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.असे गुंतवणूकदार बेकायदेशीर कृत्यांमुळे गुन्हे दाखल होऊन आणखी अडचणीत सापडतील.अडचणीत वाढ होईल.त्यामुळे गुंतवणूकदारांनी एजंटांनी पैसे परत दिले नाही म्हणून कायदा हातात न घेता संबंधितांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात.सनदशिल मार्गाचा अवलंब करावा.अन्यथा बेकायदेशीररित्या कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी पत्रक काढून केला होता.इतक्यावरच न थांबता पोलिसांनी या परिसरात रविवारी (१६) सकाळपासूनच १४४ कलम लागू करुन कोप्रोली आणि पिरकोन दरम्यानच्या गावात बंदोबस्तासाठी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात केला आहे.बंदोबस्तासाठी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आल्याने गुंतवणूकदारांनी जाहीर केलेल्या मनसुब्यांवर मात्र पाणी फेरले गेले आहे.

पोलिसांनी लागु केलेल्या १४४ कलमामुळे कोप्रोली नाक्यावर उपस्थित राहून एजंटांच्या घरी जाऊन पैसे वसूल करण्याचे आवाहनाला एकाही गुंतवणूकदारांनी प्रतिसाद दिला नाही.उलट चिटफंड घोटाळाप्रकरणी फसवणूक झालेल्या आणखी तिघांनी सतीश गावंड विरोधात तक्रारी दाखल केल्या असल्याची माहिती उरण पोलिसांकडून ठाण्यातुन देण्यात आली.

Web Title: Raigad:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.