Raigad: रस्त्यावर काँक्रीटीकरणासाठी खोदलेल्या खड्डयात कंटेनर कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 04:14 PM2023-08-26T16:14:18+5:302023-08-26T16:14:42+5:30
Accident: जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या करळ दरम्यानच्या मार्गावर वाहनचालकाचा रात्रीच्या अंधारात अंदाज चुकल्याने कॉक्रीटीकरणासाठी खोदलेल्या सहा फूट खोल खड्डयातच कंटेनर थेट कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेला नाही.
- मधुकर ठाकूर
उरण - जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या करळ दरम्यानच्या मार्गावर वाहनचालकाचा रात्रीच्या अंधारात अंदाज चुकल्याने कॉक्रीटीकरणासाठी खोदलेल्या सहा फूट खोल खड्डयातच कंटेनर थेट कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेला नाही.
जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या मार्गावरील रस्त्याचे कॉक्रीटीकरण सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यांची सूचना देण्यासाठी बॅरिकेटही लावण्यात आले होते. मात्र त्याकडे वाहनचालकाचे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केली आहे.मात्र कंटेनर वाहनातून वाहून नेण्यात येणारे वजनी सामान रस्त्यावरच कळंडल्याने अपघाताची शक्यता बळावली होती.मात्र पोलिसांनी अडथळे तातडीने दूर केल्याने रस्ता मोकळा करण्यात आला असल्याची माहिती न्हावा -शेवा वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस निरीक्षक जी.एम.मुजावर यांनी दिली.
जेएनपीए बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात चालणारी कंटेनर वाहने ही वेग मर्यादा,वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने अनेकदा अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व लहान-मोठ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे.