Raigad: अलिबाग समुद्र किनारी अचानक निर्माण झाला भोवरा
By राजेश भोस्तेकर | Published: December 6, 2023 12:00 PM2023-12-06T12:00:32+5:302023-12-06T12:02:43+5:30
Raigad: अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या जे एस एम कॉलेज मैदानावर अचानक भोवरा निर्माण झाल्याने सारेच अवाक झाले. भोवऱ्यात मैदानावरील कचरा घेत हा भवरा दीड मिनिट पर्यंत घोघावत राहून अखेर गायब झाला.
- राजेश भोस्तेकर
अलिबाग - अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या जे एस एम कॉलेज मैदानावर अचानक भोवरा निर्माण झाल्याने सारेच अवाक झाले. भोवऱ्यात मैदानावरील कचरा घेत हा भवरा दीड मिनिट पर्यंत घोघावत राहून अखेर गायब झाला. अचानक सुरू झालेल्या भवऱ्याचे फोटो काढण्यास उपस्थित दंग झालेले दिसले.
आंध्र प्रदेश मध्ये कालच चक्रीवादळ घोंघावून दैना उडवली होती. रायगड जिल्ह्याला निसर्ग आणि तोक्ती वादळाचा फटका याआधी बसला आहे. अलिबाग समुद्र किनारी जे एस एम मैदानावर सकाळी साडे अकराच्या दरम्यान अचानक भवरा निर्माण झाला. त्यामुळे अनेकांच्या नजरा फिरल्या. भवरा तयार झाल्यानंतर मोठा रिंगण तयार झाले. या भवऱ्यात मैदानावरील कचरा सामावून घेऊन तो पुढे सरकू लागला. दीड मिनिट पर्यंत हा भवरा चक्राकार फिरत होता. त्यानंतर भवरा हा शांत झाला. अचानक निर्माण झालेल्या या भवऱ्याने उपस्थित सारेच अचंबित झाले.