रायगडला पुन्हा ‘अवकाळी’ पावसाचा फटका; आंबापीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 01:03 AM2020-12-15T01:03:32+5:302020-12-15T01:03:39+5:30

बळीराजा आर्थिक संकटात; डिसेंबर महिन्यात थंडीच्या दिवसांत पाऊस!

Raigad again hit by 'untimely' rains | रायगडला पुन्हा ‘अवकाळी’ पावसाचा फटका; आंबापीक धोक्यात

रायगडला पुन्हा ‘अवकाळी’ पावसाचा फटका; आंबापीक धोक्यात

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क
तळा : दोन दिवसांपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने सोमवारी जोरदार आगमन केले. सकाळपासूनच तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. २०२० हे वर्ष आणखी काय काय दाखविणार आहे सांगता येत नाही. कोरोना महामारी, लॉकडाऊन, निसर्ग चक्रीवादळ, जागतिक आर्थिक मंदी आणि आता डिसेंबर महिन्यात थंडीच्या दिवसांत पाऊस.
सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून नऊ-दहा वाजेपर्यंत पावसाने जोरदार बरसने सुरू केल्याने रब्बी हंगामातील कडधान्ये, वाल, मूग, मटकी, हरभरा, भाजीपाला, कलिंगड, आंबा, चिकू बागादेखील धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामधून आर्थिक हातभार लागेल या आशेवर बळीराजा होता. मात्र, आता या लहरी हवामान व अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गुरांसाठी (वैरणी) शेतात साठवून ठेवलेले गवत, पेंढ्याचे माच संपूर्ण भिजून ओलेचिंब झाले आहेत. गुरांना खायला काय? घालायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे बाजारात आलेले नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांसह शालेय विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. 
  हवामानामुळे आरोग्य धोक्यात येईल की काय? अशी भीती आता नागरिकांना वाटू लागली आहे. रस्त्यावरील खड्डे पाण्यांनी भरल्याने डबकी तयार झाली त्याचा वाहनचालकांना प्रवास करताना त्रास जाणवत होता. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी एमआयडीसी परिसरात सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून मुसळधार पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. डिसेंबर महिन्यात छत्री रेनकोटचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे अवेळी पाऊस पडत आहे.

पडणाऱ्या पावसाने कडधान्याचे पीक धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातून कडधान्याची पिकेही जातील, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे . अवकाळी पावसामुळे  पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Raigad again hit by 'untimely' rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.