शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

रायगडमध्ये बुधवार ठरला आंदोलन वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:22 PM

प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी : महसूल कर्मचारी रजेवर, संगणक परिचालक, ग्रामसेवकांचे धरणे

रायगडमधील सुमारे ८०० कर्मचारी बुधवारी प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात या मागणीसाठी एका दिवसाच्या सामूहिक रजेवर गेले. त्याचबरोबर जिल्ह्यातील सुमारे ५०० संगणक परिचालकांनी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन देऊन निर्णय न दिल्यामुळे २८ आॅगस्ट रोजी पंचायत समितीच्या प्रांगणात धरणे आंदोलन के ले. तरपेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक २२ आॅगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत. बुधवार हा या आंदोलनाचा सातवा दिवस असून, ग्रामसेवक पेण पंचायत समितीसमोर ठिय्या मांडून बसले आहेत. सध्या सर्वच शासकीय कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारत आहे. यामध्ये ग्रामसेवक, संगणक परिचालक, महसूल कर्मचारी, विनाअनुदानित शाळांचे शिक्षक यांचे विविध प्रकारे आंदोलन सुरू असल्याने एकंदर शासकीय यंणत्राच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे सामान्य नागरिकांची कामे रखडल्याने हाल होत आहेत.महसूल कर्मचारी सामूहिक रजेवरअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सुमारे ८०० कर्मचारी बुधवारी एका दिवसांच्या सामूहिक रजेवर गेले. प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात या मागणीसाठी ‘सामूहिक रजा’ हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महसूल विभागातील दैनंदिन कामकाजांना ब्रेक लागला. मोठ्या संख्येने कर्मचारी सामूहिक रजेवर असल्यामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. कामानिमित्त येणाºयांचे मात्र चांगलेच हाल झाले.गेल्या काही वर्षांपासून सरकारी सेवेत असणाºया कर्मचाºयांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या पूर्ण कराव्यात याबाबत सातत्याने निवेदन, मोर्चा, घंटा नांद करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी महसूल कर्मचाºयांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले. या आंदोलनामध्ये २५६ क्लार्क, १७८ शिपाई, ६८ मंडळ अधिकारी, २१६ अव्वल कारकून, ३६ नायब तहसीलदार यासह अन्य अशा १५ तालुक्यांतील तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारीकार्यालयातील कर्मचाºयांचा समावेश होता. महसूल कामानिमित्त सरकारी कार्यालयात मोठ्या संख्येने नागरिक विविध कामानिमित्त येत असतात. कर्मचारी संपावर असल्याने आजच्या कामकाजावर परिणाम झाला. काहींना सरकारी कर्मचाºयांनी पुकारलेल्या आंदोलनाची माहिती नव्हती, त्यामुळे कार्यालयात कामानिमित्त येऊन फुकटचा हेलपाटा झाल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप झाला. सेतू कार्यालयातून मिळणाºया विविध दाखल्यांवरही आंदोलनाचा परिणाम झाला. आज दिवसभरात एकाही दाखल्याचे काम झाले नाही.

पेणमधील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलनपेण : शासन दरबारी ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लक्ष वेधून घेण्यासाठी रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामसेविका २२ आॅगस्टपासून बेमुदत संपावर गेल्याने ग्रामपंचायतीचे कारभार ठप्प झालेले आहेत. गावगाड्यांचा संपूर्ण व्यवहार बंद झाल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामसेवक पंचायत समिती पेण येथे दररोज १०.३० ते ५.३० या वेळेत धरणे आंदोलन करीत असून, गेले सात दिवस दिवसभर ठिय्या आंदोलन सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने ग्रामसेवकांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आंदोलन करण्यापूर्वी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी आपले कामकाजाचे सर्व शिक्के गटविकास अधिकाºयांकडे २२ आॅगस्ट रोजी जमा क रून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेले आहे. गेले सात दिवस पेणचे ४० ग्रामसेवक दररोज पेण पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहेत. त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या पूर्वीही पंचायत समिती, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते. याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री व मंत्री, प्रधान सचिव यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या संबंधीची निवेदने ग्रामसेवक राज्यव्यापी संघटनेमार्फत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना देण्यात आली होती, तसेच प्रधान सचिव तसेच मंत्री महोदय यांच्यासोबत सह्याद्री अतिथिगृहावर बैठक घेऊन प्रलंबित मागण्या १०० टक्के सोडविण्याचे आश्वासनसुद्धा देण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत शासनाकडून कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्याने व दिलेल्या आश्वासनाचे रूपांतर शासकीय आदेशात होत नाही, तोपर्यंत ग्रामसेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू राहणार आहे. ग्रामीण पातळीवर सर्व व्यवहार व ग्रामपंचायतीच्या कामकाजाला या आंदोलनाचा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे.पेण तालुका ग्रामसेवक युनियन डी.एन.ए. १३६ या संघटनेचे सर्व ग्रामसेवक सातव्या दिवशी पेण पंचायत समिती येथे ठिय्या मारून आंदोलनाबाबत व आपल्या मागण्यांबाबत ठाम राहिले आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील व सचिव प्रवीण पाटील यांनी माहिती देताना सांगितले. सध्या सर्वच शासकीय कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारीत आहेत.संगणक परिचालक संघटनेचे धरणेम्हसळा : राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ प्रकल्पात काम करणाºया संगणक परिचालकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन देऊन निर्णय न दिल्यामुळे संगणक परिचालकांनी २८ आॅगस्ट रोजी पंचायत समितीच्या प्रांगणात धरणे आंदोलन केले.राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायत कार्यालयात काम करणारे सर्व संगणक परिचालकांसह ३५१ पंचायत समित्या व ३४ जिल्हा परिषदांमधील सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी १९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असून शासनाने अद्यापपर्यंत दखल न घेतल्यामुळे २८ आॅगस्ट रोजी धरणे आंदोलनाचा पवित्रा उचलला. पंचायत समिती म्हसळाच्या प्रांगणात झालेल्या या आंदोलनास सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, पंचायत समिती सदस्य मधुकर गायकर यांनी सामोरे जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले आणि त्यांच्या भावना शासनापर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले.