Raigad: करंजा- कोंढरी पाड्यातील घरात घुसला साडेआठ फूट लांबीचा अजगर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 01:35 PM2023-08-27T13:35:47+5:302023-08-27T13:36:05+5:30
Raigad: करंजा- कोंढरी पाड्यातील एका महिलेच्या घरात साडेआठ फूट लांबीचा अजगर घुसला. भक्षाच्या शोधार्थ आलेल्या साडेनऊ फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगराला सर्पमित्र नितीन अरुण घरत यांनी शिताफीने पकडले.
- मधुकर ठाकूर
उरण - करंजा- कोंढरी पाड्यातील एका महिलेच्या घरात साडेआठ फूट लांबीचा अजगर घुसला. भक्षाच्या शोधार्थ आलेल्या साडेनऊ फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगराला सर्पमित्र नितीन अरुण घरत यांनी शिताफीने पकडले.
करंजा- कोंढरी पाड्यातील रहिवासी असलेल्या नर्मदा म्हात्रे यांच्या राहत्या घरातच रविवारी (२७) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास एक साडेआठ फूट लांबीचा इंडियन रॉक पायथॉन जातीचा अजगर घुसला.घरात घुसतानाच साडेआठ फुटी लांबीच्या अजगराचे धूड नजरेत पडल्याने बोबडी वळलेल्या नर्मदा म्हात्रे यांनी जवळच रहात असलेल्या सर्पमित्राला पाचारण केले.सर्पमित्र नितीन घरत यांनी घरात घुसलेल्या अजगराचा शोध घेण्यास सुरुवात केली.शोध घेताना घरातील प्लास्टिक टाकीच्या बाजूला अजगर लपून बसला असल्याचे दिसून आले.सर्पमित्र नितीन घरत यांनी साडेनऊ फुटी लांबीच्या अजगराला शिताफीने पकडले.अजगराला पकडून घराबाहेर काढल्यानंतरच महिला आणि घरातील माणसांचा जीव भांड्यात पडला.हा अजगर भक्षाच्या शोधार्थ नागरी वस्तीत आला असण्याची शक्यता सर्पमित्र नितीन घरत यांनी व्यक्त केली. वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर त्याला नैसर्गिक आवासात सोडून दिले जाणार असल्याचेही घरत यांनी सांगितले.