Raigad: पोयनाडमधून बांग्लादेशी महिलेला अटक
By निखिल म्हात्रे | Published: August 21, 2023 06:05 PM2023-08-21T18:05:09+5:302023-08-21T18:06:11+5:30
Raigad: बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी ही रायगड पोलिसांपुढे डोकेदुखी ठरली आहे. मागली पंधरावर्षांपासून पोयनाड येथे राहणाऱ्या 33 वर्षीय महीलेला रविवारी संध्याकाळी पोयनाड पोलिसांनी अटक केली आहे.
- निखिल म्हात्रे
अलिबाग - बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी ही रायगड पोलिसांपुढे डोकेदुखी ठरली आहे. मागली पंधरावर्षांपासून पोयनाड येथे राहणाऱ्या 33 वर्षीय महीलेला रविवारी संध्याकाळी पोयनाड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच बेकायदेशीरपणे रायगड जिल्ह्यात बस्तान मांडलेल्या नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम ही सुरु केली आहे.
बांगलादेशी नागरिकांची धुसखोरी वाढल्यांने त्यांच्या शोधासाठी 2013 मध्ये बांगलादेशी विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने रायगडमध्ये शोधकाम सुरु केले होते. शोध मोहीम सुरु शहानाबीबी जोहीद्दुल शेख मुळ राहणार बांग्लादेश या सध्या रा-गणेश नगर येथील अश्विनी चाळ येथे वास्तव्यास असल्याची माहीती पोलिसांना गोपनिय सुत्रांकडून मिळाली होती. बांगलादेशी नागरीक शहानाबीबी जोहीद्दूल शेख हिच्याकडे कोणतेही वैध प्रवासी कागपत्र पासपोर्ट, व्हिसा, किंवा भारत सरकाने अथवा भारतीय सिमेवरील नोंदणी अधिकाऱ्याने नेमुण दिलेल्या मार्गा व्यतीरीक्त भारत बांगलादेश सिमेवरून चोरटया मार्गाने घुसखोरी करून भारतीय सरहददीत प्रवेश करीत मागील 15 वर्षापासुन भारतामध्ये बनावट अधारकार्ड बनवुन अनधिकृतपणे वास्तव्य करीत होती. आरोपी शहानाबीबी जोहीद्दूल शेखला रविवारी संध्याकाळी 6:17 वा च्या सुमारास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क. 465, 468, परदेशी नागरीक अधिनियम, 1946 चे कलम 14 A, पारपत्र अधि 1950 चे कलम 3 अ, सह 6 अ, विदेशी व्यक्ती अधि 1948 चे कलम 3,1, अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि लांडे करीत आहेत .
कारखान्यांमधील लेबर कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे हे बांगलादेशी नागरिक काम मागण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे रायगड जिल्ह्यात परराज्यातून येणार्या प्रत्येक नागरिकाची माहिती पोलिसांना कळविण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मोहल्ला बैठका घेऊन अशा नागरिकांची माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.