रायगड- पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देतानाच मित्र पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश घेणार नाही. असा ठरावच वरिष्ठ पातळीवर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपा हाच एक नंबरच प्रतिस्पर्धी राहणार आहे, असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांनी येथे स्पष्ट केले.
स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वारे आता जिल्ह्यात वाहू लागले आहेत. त्या आधीच राष्ट्रवादी काॅंग्रेसने जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्येकर्ते यांच्याबराेबर सयुंक्त दाैऱ्याचे आयाेजन केले आहे. शुक्रवारी अलिबाग तालुक्यामध्ये या दाैऱ्यांचे आयाेजन भाग्यलक्ष्मी हाॅल येथे करण्यात आले हाेते. त्याप्रसंगी खासदार तटकरे बाेलत हाेेते. त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गाऱ्हाणी एेकून घेतली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी जाेमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत घटक पक्ष असणाऱ्या शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याबराेबर समन्वय राहीला नाही का असा प्रश्न विचारण्यात आला. " का धरला मजवरी राग..."असे गीत गाऊन तटकरे यांनी आमदार पाटील रागवाले असल्याचे सुचकपणे सांगितले. मात्र याबाबतीमध्ये वेळ आल्यावर बाेलेण असेही सांगायला ते विसरले नाहीत. शेकापहा महाविकास आघाडीचा सुरुवातीपासूनचा घटक पक्ष असल्याने " जीवनातली घडी अशीच राहू दे ..." अशी आर्त हाक त्यांनी आपल्या खाल शैलीतून आमदार पाटील यांना दिली आहे. आमदार पाटील याबाबत काेणती भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट हाेणार आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल, परंतू भाजपा हाच एक नंबरचा प्रतिस्पर्धी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, याप्रसंगी काेराेना कालावधीत आणि निसर्ग चक्रीवादळात पुढे हाेऊन काम करणाऱ्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना खासदार तटकरे यांच्याहस्ते गाैरवण्यात आले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, अलिबाग तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश घारे, अलिबाग तालुका राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मनाेज शिर्के, वाडगावचे माजी सरपंच जयेंद्र भगत, आशिष भट यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित हाेते. पालकमंत्री आदिती तटकरे यांची मंत्रालयामध्ये विशेष बैठक असल्याने त्या या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत.पेण अर्बन बॅंकेतील ठेवीदार खातेदार यांना तातडीने न्याय देण्यासाठी त्यांना पैसे कसे देता येतील याबाबत कालबध्द कार्यक्रम आखाण्यात यावा असे निर्देश त्यांनी बैठकीमध्ये दिले. याबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी पार पडली. पेण अर्बन बॅंकेला बळ देण्यासाठी लवकरच तीचे सशक्त बॅंकेत विलगीकरण करण्यासाठी आवश्यकत्या कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करा असेही त्यांनी सांगितले.