‘खेलो इंडिया’त रायगडचे स्पर्धक चमकावेत- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:03 PM2020-02-24T23:03:25+5:302020-02-24T23:03:33+5:30

रोह्यात दोन दिवसीय क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

Raigad contestants shine in 'Khelo India' - Sunil Tatkare | ‘खेलो इंडिया’त रायगडचे स्पर्धक चमकावेत- सुनील तटकरे

‘खेलो इंडिया’त रायगडचे स्पर्धक चमकावेत- सुनील तटकरे

Next

धाटाव : रोहा तालुक्यामध्ये विकास करत असताना तालुका क्रीडा संकुल उभे केले. ‘खेलो इंडिया’तील स्पर्धांमध्ये यापुढे रायगड जिल्ह्यातील विशेषत: रोह्यातील खेळाडू सहभागी होतील, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. रोह्यातील क्रीडा संकुलातील जलतरण तलावासाठी ८.५ कोटींचा प्रस्ताव राज्याकडे आला आहे. आगामी केंद्रीय अधिवेशनात भारत सरकारच्या ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमात आॅलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाला १०० टक्के मान्यता मिळविली जाईल, असे अभिवचन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

रोहा (धाटाव) येथील क्रीडा संकुलाच्या प्रांगणावर २०२० वर्षामध्ये पंचायत समिती, रोहा यांच्या वतीने कर्मचारी वर्गासाठी आयोजित क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती गुलाब वाघमारे, उपसभापती रामचंद्र सपकाळ, मधुकर पाटील, विजय मोरे, विनोद पाशिलकर, अनिल भगत, रोहिदास पाशिलकर, माजी सभापती राजश्री पोकळे, विनायक चितळकर, सदस्य संजय भोसले, बिलाल कुरेशी, सिद्धी राजिवले, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, साहाय्यक गटविकास अधिकारी पंडित राठोड, बालविकास अधिकारी शरयू भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय ससाने, पाणीपुरवठा अधिकारी प्रशांत म्हात्रे, यशवंत रटाटे उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक व्याधी बळावल्या आहेत. क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यात आपण सक्षम राहू शकतो. यंदा राज्याला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. अशा स्पर्धा भरवायच्या असतील तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याचा नियम राज्य सरकारने करावा, अशी भूमिका घेतली जाईल. महसूल विभाग अशा विभागीय स्पर्धा घेत असेल तर ग्रामविकास खात्यानेसुद्धा स्पर्धा भरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.

क्रीडा व सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष नारायण गायकर यांनी, सर्व कर्मचारी शासन निर्णयाने काम करीत असताना ताणतणावातून मुक्त होण्यासाठी व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी स्पर्धा घेतल्या असल्याचे नमूद केले.
रोहा तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणात दोन दिवस क्रिकेट, कबड्डी, लंगडी व खो-खो, हॉलीबॉल आदी स्पर्धा होणार आहेत.

Web Title: Raigad contestants shine in 'Khelo India' - Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.