बिद्रे खून प्रकरण, राजेश पाटील यांचा जामीन अर्ज रायगड न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 05:04 AM2018-04-14T05:04:55+5:302018-04-14T05:04:55+5:30
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपी राजेश पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीअंती हा जामीन अर्ज येथील जिल्हा सत्र न्यायाधीश बी. सी. कांबळे यांनी शुक्रवारी फेटाळला आहे.
अलिबाग : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपी राजेश पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीअंती हा जामीन अर्ज येथील जिल्हा सत्र न्यायाधीश बी. सी. कांबळे यांनी शुक्रवारी फेटाळला आहे. राजेश पाटील हे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे असून, त्यांच्या या जामीन अर्जावरील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.
या प्रकरणात ताब्यात असलेल्या आरोपींपैकी फक्त राजेश पाटील यांनीच जामिनासाठी १५ दिवसांपूर्वी अर्ज केला आहे. ज्या दिवशी बिद्रे यांचा खून झाला, त्या दिवशी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये राजेश पाटील हे हजर होते, त्याचबरोबर त्याचा अश्विनी बिद्रे यांचा खून करून तुकडे भार्इंदरच्या खाडीत टाकण्यात सहभाग होता, असे तपासात उघड झाले आहे. १० डिसेंबरला त्यांना बेळगाव येथून पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले, तेव्हापासून ते पोलिसांच्या ताब्यात आहेत.
कळंबोली पोलिसात या प्रकरणाची तक्र ार दाखल झालेली आहे. प्रथम त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होता. आता हत्येतील प्रत्यक्ष सहभागामुळे खुनाचाही गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष पवार यांनी दिली. या अर्जावरील निकाल शुक्रवारी न्यायालयाने
दिला आहे.