रायगड जिल्ह्यात महाश्रमदान, ६३४ ग्रामपंचायती : ११,६३३ नागरिकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:51 AM2018-09-26T04:51:15+5:302018-09-26T04:51:20+5:30
‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाला रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींपैकी ६३४ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी एकाच वेळी महाश्रमदान दिन साजरा करण्यात आला.
-आविष्कार देसाई
अलिबाग : ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाला रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींपैकी ६३४ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी एकाच वेळी महाश्रमदान दिन साजरा करण्यात आला. स्वयंस्फूर्तीने ११ हजार ६३३ नागरिकांनी आपल्या हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
विविध पंचायतीमधील सुमारे सहा हजार ८४० कर्मचाऱ्यांनीही आपापल्या विभागाची स्वच्छता केली. मोहिमेतून हजारो टन कचरा गोळा करण्यात आला. हे अभियान १२ आॅक्टोबर २०१८ पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतीत येत्या काही दिवसांमध्ये स्वच्छता मोहीम राबवणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली.
रायगड जिल्ह्याने आतापर्यंत राबवण्यात आलेल्या विविध स्वच्छतेशी संबंधित अभियानात चांगली कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात आठवा तर कोकणामध्ये अव्वल स्थान पटाकवण्यामध्ये जिल्ह्याने बाजी मारली होती. हागणदारीमुक्तीमध्येही जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाची सुरुवात केली आहे. २ आॅक्टोबरपर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे. प्रत्येक नागरिकाने यामध्ये स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग देणे अपेक्षित आहे.
याच योजनेचा भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील तब्बल ८०६ ग्रामपंचायतींपैकी ६३४ ग्रामपंचायतींमध्ये महाश्रमदान दिन पाळण्यात आला. विशेष करुन मंगळवारी मोठ्या संख्येने ग्रामपंचायती यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तब्बल ११ हजार ६३३ नागरिकांना यामध्ये सहभाग घेत स्वत:च्या हातामध्ये झाडू घेत त्यांनी आपापल्या गावाची स्वच्छता केली. त्यांच्या जोडीला त्यात्या विभागातील सहा हजार ८४० कर्मचारीही मदतीला होते. स्वच्छता मोहिमेतून हजारो टन कचरा गोळा करण्यात आल्याने पंचायती चकाचक झाल्या होत्या.
नागरिकांमध्ये प्लॅस्टिकबंदीबाबत जागृती
अलिबाग शहरापासून जवळच असणाºया थळ ग्रामपंचायतीमध्येही ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे, रविकिरण गायकवाड, सुनील माळी, सरपंच रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामसेवक ठाकूर यांच्यासह अन्य कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवला. मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकरही बुधवारी होणाºया मोहिमेत सहभागी होणार असल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले.
सरकारने प्लॅस्टिकबंदी करण्याआधी सर्वत्र मोठ्या संख्येने कचºयामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, ग्लास, थर्माकोलच्या थाळ््या दिसून यायच्या मात्र आता त्यावर चाप बसला आहे. कचºयामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण कमी झाल्याचे गोळा केलेल्या कचºयावरुन दिसून येत असल्याचा दावा पाणी व स्वच्छता विभागाने केला आहे. नागरिकांमध्ये प्लॅस्टिकच्या वापराबाबत जागृती होत असल्याचे यावरुन दिसून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.