अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये गेले नऊ दिवस नवरात्रोत्सवाची चांगलीच धूम पाहायला मिळाली. तरुणाईसह आबालवृद्धांनीही हा उत्सव अतिशय जल्लोषात साजरा केला. गुरुवारी दसºयाच्या दिवशी नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. सायंकाळी देवीच्या एक हजार २८६ मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक हजार १०८ सार्वजनिक तर, १७८ खासगी मूर्तींचा समावेश आहे. दसऱ्याच्या सणानिमित्त बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
बुधवार, १० आॅक्टोबर रोजी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आदिशक्तीची स्थापना करण्यात आली. त्याच्या पुढील नऊ दिवस नवरात्रोत्सवानिमित्त गरबा आणि दांडिया चांगलाच रंगल्याचे दिसून आले. बुधवारी सायंकाळी घरोघरी स्थापन केलेले घट उचलण्यात येणार आहेत. त्यानंतर गुरुवारी जिल्ह्यात दसरा सणाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.
दसºयानिमित्त बाजारपेठांमध्ये चांगलीच गर्दी झाली होती. विशेष करून झेंडूच्या फुलांची दुकाने जागोजागी सजली होती. आंब्याची डहाळे, शेतामध्ये नवीन आलेल्या भाताची कणशीचे तोरण त्याचप्रमाणे दसºयामध्ये सोने लुटण्याची परंपरा आहे. त्यानिमित्ताने आपट्याच्या झाडाच्या पानांनीही बाजारपेठ सजल्याचे दिसून आले. त्यांची खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये चांगलीच धूम दिसत होती.
सायंकाळी सार्वजनिक मंडळांच्या देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मिरवणुका निघणार आहेत. डीजेवर बंदी असल्यामुळे मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांनाच पसंती दिली जाणार आहे. यासाठी काही मंडळांनी ढोल-ताशा पथक, लेझीम पथकांना आमंत्रित केले आहे.दरम्यान, मिरवणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस बंदोबस्त, त्याचप्रमाणे जिल्ह्यात दोन स्ट्रायकिंग फोर्स, सीआरपीफ दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.पावसामुळे विक्रेत्यांचे नुकसानदसºयाच्या पूर्वसंध्येला सोसाट्याच्या वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेचा कडकडाट करीत पावसाने वातावरण चिंब केल्याने चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. विशेषत: गावखेड्यातून झेंडूची फुले विकण्यासाठी शहराच्या विविध भागात डेरेदाखल झालेल्या गरीब विक्रेत्यांची मात्र एकाच धावपळ झाली.अचानक कोसळलेल्या पावसामुळे झेंडूची फुले भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसाने दडी मारल्याने यावर्षी झेंडूच्या उत्पादनात अगोदरच घट झाली आहे. हाती आलेले जेमतेम उत्पादन घेऊन कुटुंबासह शहरात आलेल्या विक्रेत्यांना दसºयाच्या काही तास अगोदरच पावसाने दणका दिला. त्यामुळे दसºयाच्या मुहूर्ताची वाट पाहत पदपथावर फुलांचा बाजार मांडून बसलेल्या विक्रेत्यांची मोठी निराशा झाली आहे.कृषी उत्पन्न समितीकडून वसुलीशेतकºयांना थेट मालाच्या विक्र ीची मुभा असताना पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कळंबोली येथे आलेल्या फूल विक्रे त्यांकडून बाजार शुल्क आकारण्यात आले. प्रत्येकी दोन रुपये वसुली करण्यात आली. त्यांना रीतसर पावती देण्यात आली. मात्र, या धोरणाबाबत विक्रे त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर महापालिकेच्या सफाई कामगारांनीसुद्धा गावखेड्यातून आलेल्या या विक्रे त्यांकडून वीस ते पंचवीस रुपये आकारल्याच्या तक्रारी आहेत.झेंडूला मागणी वाढलीपनवेल : दसरा-दिवाळीत झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. या पार्श्वभूमीवर फूलशेती करणारे शेतकरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झेंडूचे उत्पादन घेतात. मात्र, यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने झेंडूच्या उत्पादनात कमालीची घट निर्माण झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने झेंडूच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली. बुधवारी नवी मुंबई आणि पनवेल परिसरात एक किलो झेंडू १00 रुपयात विकला गेला. दसऱ्याच्या दिवशी यात आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.ऐन झेंडूच्या वाढीच्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने फुलांच्या गुणवत्तेवर, उत्पादनावरही परिणाम झाला. बाजारात दाखल होणारा झेंडू काही प्रमाणात कोमेजलेला व आकाराने लहान असल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यानी दिवाळी डोळ्यासमोर ठेवून झेंडूची विलंबाने लागवड केली होती. मात्र, परतीच्या पावसानेही दगा दिल्याने झेंडूच्या पिकाला फटका बसला. पुणे व दादर फूलबाजारामध्ये यंदा फुले कमी आली. तर. कृषी उत्पन्न बाजारपेठेत दरवर्षापेक्षा यंदा आवक कमी असल्याने व्यापारी व विक्रेत्यांना जास्त पैसे मोजले.