रायगड जिल्ह्यात सरासरी ८६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 06:56 AM2017-10-17T06:56:56+5:302017-10-17T06:56:56+5:30

रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या एक हजार ३१८ जागांसाठी सोमवारी सरासरी ८६ टक्के मतदान झाले. तीन हजार १११ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले.

Raigad district has an average voter turnout of 86 percent | रायगड जिल्ह्यात सरासरी ८६ टक्के मतदान

रायगड जिल्ह्यात सरासरी ८६ टक्के मतदान

Next


रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या एक हजार ३१८ जागांसाठी सोमवारी सरासरी ८६ टक्के मतदान झाले. तीन हजार १११ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले. ठिकठिकाणी शांततेमध्ये मतदान पार पडले. कोठेही मतदान यंत्र बंद पडण्याचे प्रकार घडले नसल्याचा दावा प्रशासनाने केला. मंगळवारी तहसीलदार कार्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरु वात होणार आहे.


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या एक हजार ३१८ जागांसाठी सोमवारी सरासरी ८६ टक्के मतदान झाले. तीन हजार १११ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले. ठिकठिकाणी शांततेमध्ये मतदान पार पडले. कोठेही मतदान यंत्र बंद पडण्याचे प्रकार घडले नसल्याचा दावा प्रशासनाने केला. मंगळवारी तहसीलदार कार्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरु वात होणार आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीपासून थेट नगराध्यक्ष निवडीला सुरु वात झाल्यानतंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांना प्रतिष्ठेची आहे. २४२ ग्रामपंचायतींमध्ये २ हजार १९८ जागांमध्ये ८१० जागांवर सरपंच व सदस्य हे निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. ७० जागा रिक्त राहिल्या आहेत. एक हजार ३१८ जागांवर तीन हजार ३१८ उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरु वात झाली होती. सकाळीपर्यंत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. दुपारी काही प्रमाणात ही संख्या रोडावली होती. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ८३ टक्के मतदान झाल्याचे तहसीलदार प्रकाश सकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिरवलीमध्ये ७७ टक्के, वैजाळी ८३ टक्के, आक्षी ८० टक्के, बोरीस-गुंजीस ९१ टक्के, मुळे-९३ टक्के, नारंगी-७९ टक्के मतदानाचा समावेश आहे.
६१२ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया झाली. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माणगावात ग्रामपंचायत निवडणुका शांततेत
माणगाव : तालुक्यातील होऊ घातलेल्या १९ ग्रामपंचायतीपैकी १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रि या सोमवारी शांततेत व उत्साहात पार पाडली. तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीसांनी दिली.
तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीपैकी ४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित १५ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी ७०टक्के इतके मतदान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.



माणगाव : तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी मंगळवारी १७ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून प्रशासकीय भवन माणगाव तहसील कार्यालय येथील वरच्या हॉलमध्ये होणार असल्याची माहिती तहसीलदार ऊर्मिला पाटील यांनी दिली.
माणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी शिरवली तर्फे निजामपूर, पळसप, कुंभे, टोळ खुर्द या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्यामुळे उर्वरित पंधरा ग्रामपंचायतीचे मतदान सोमवारी १६ आॅक्टोबर रोजी झाले. या पंधरा ग्रामपंचायतीची मतमोजणी मंगळवारी होत आहे. याकरिता नऊ टेबल लावण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. यामध्ये चिंचवली ग्रामपंचायतीची मतमोजणी चार फेºयात, नांदवी एक फेरी, साई चार फेºया अशा प्रकारे मतमोजणी होणार असल्याचे तहसील कार्यालयाकडून जाहीर केले.


आज होणार मतमोजणी


कर्जतमध्ये १३१ सदस्यांचे भवितव्य मतयंत्रात बंद


कर्जत : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी १६आॅक्टोबर रोजी मतदान झाले. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंचपदाबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. सात सरपंचपदांसाठी १४ तर सात ग्रामपंचायतीच्या ६२ जागांसाठी १३१ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतयंत्रात बंद आहे.
तालुक्यातील कळंब, दहिवलीतर्फे वरेडी, वेणगाव, उक्रुळ, वावलोळी, मांडवणे आणि कोंडीवडे ग्रामपंचायतीसाठी १६ आॅक्टोबर रोजी मतदान झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या, परंतु काही ठिकाणी चार तर काही ठिकाणी तीन मते मतयंत्राद्वारे द्यायची असल्याने सुरु वातीला थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सरपंच व सदस्य असे एकूण १४५ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद आहे. मतमोजणी १७ आॅक्टोबर रोजी होणार असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल लागतील.

१९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
1नागोठणे : विभागात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रि या पेण तालुक्यातील कोलेटी येथे सोमवारी शांततेत पार पडली. या ग्रामपंचायतीमध्ये कोलेटी गावात २ आणि कोलेटीवाडी १ अशी ३ मतदान केंदे्र आहेत. १५ उमेदवार रिंगणात असून त्यातून सात उमेदवार निवडून येणार आहेत. सरपंचपद महिलेसाठी राखीव आहे. काँग्रेस, शेकाप, भाजपा आणि शिवसेना या राजकीय पक्षांच्या चार उमेदवार सरपंचपदासाठी जनमत आजमावत आहेत. ३ मतदान केंद्रात मतदारांची संख्या ९६३ इतकी असून त्यापैकी आज ८४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८८ टक्के झाली. मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पो. नि. पी. बी. गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्र व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महाड एमआयडीसीत मतदान प्रक्रि या शांततेत
3बिरवाडी : महाड एमआयडीसीमधील सवाणे, धामणे, नाडगावतर्फे बिरवाडी, कांबळेतर्फेबिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य पदाकरिता निवडणूक प्रक्रि या सोमवारी सकाळपासून शांततेत सुरू झाली आहे. १६ आॅक्टोबर २०१७ रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रि येला सुरु वात झाली असून मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता यावा याकरिता मतदान केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचारी तैनात असून सकाळपासून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेमधूनच होत असल्याने या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुरु डमध्ये ८४ टक्के मतदान
4आगरदांडा : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लेई, काकळघर या निवडणुकीसाठी ७९ टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरु वात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी कमी होती. दुपारच्या सत्रात मतदान करण्यासाठी लांबच लांब रांगा महिलांची व युवकांची गर्दी पाहाव्यास मिळाली. वावडुंगी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ७९ टक्के मतदान झाले. या ठिकाणी आधीच सर्व सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. वेळास्ते ग्रामपंचायत सरपंचपदासाठी तर ७ सदस्यपदासाठी ८८.५५ टक्के मतदान झाले. तेलवडे ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद तर ४ सदस्यपदासाठी ८५.९१ टक्के मतदान झाले. या ठिकाणी तीन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आलेत. कोर्लेई ग्रामपंचायत सरपंचपद तर ९ सदस्यपदासाठी ८२.८० टक्के मतदान. काकळघर ग्रामपंचायत सरपंचपद तर ९ सदस्यपदासाठी ८६ टक्के मतदान झाले. या ठिकाणी १ सदस्यपदाचा उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आलेला आहे. सर्वच ठिकाणी मतदान शांततेत पार पडले असे मुरु ड तहसीलदार उमेश पाटील यांनी यावेळी सांगितले. मंगळवारी मुरु ड दरबार हॉल येथे सकाळी ९ वाजता मतमोजणी असणार आहे.
 

Web Title: Raigad district has an average voter turnout of 86 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.