रायगड जिल्ह्यामध्ये मतदारांच्या संख्येत वाढ, २२ लाख १ हजार ३२६ मतदार बजावणार हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 03:48 AM2019-02-06T03:48:08+5:302019-02-06T03:48:31+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण २२ लाख एक हजार ३२६ मतदारांची नोंदणी झाली आहे. हे मतदार येत्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Raigad district has the right to increase the number of voters, 22 lakhs 1 thousand 326 voters | रायगड जिल्ह्यामध्ये मतदारांच्या संख्येत वाढ, २२ लाख १ हजार ३२६ मतदार बजावणार हक्क

रायगड जिल्ह्यामध्ये मतदारांच्या संख्येत वाढ, २२ लाख १ हजार ३२६ मतदार बजावणार हक्क

Next

अलिबाग : आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण २२ लाख एक हजार ३२६ मतदारांची नोंदणी झाली आहे. हे मतदार येत्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी रोजी रायगड जिल्ह्याची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन हजार ६९३ मतदान केंद्रांवर तसेच मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरही मतदार यादी पाहता येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिध्द झालेल्या प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात १० लाख ९८ हजार ७२७
पुरु ष मतदार, तर १० लाख ५५ हजार ६४१ महिला मतदार आणि चार अन्य मतदार होते. त्यानंतर राबविण्यात आलेल्या पुनरिक्षण कार्यक्र मात जिल्ह्यात मतदार नोंदणी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर करण्यात आली. त्यात नवीन नाव नोंदणी, नाव वगळणी, पत्ता बदल आदी पुनरिक्षण करण्यात आले. त्यानंतर ३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यात ११ लाख १९ हजार ७४३ पुरु ष मतदार, १० लाख ८० हजार ५१३ महिला मतदार व अन्य तीन मतदार असे एकूण २२ लाख २५९ मतदार नोंदविण्यात आले. तसेच १०५७ सर्व्हिस मतदार व १० एनआरआय मतदार यांचा समावेश करून जिल्ह्यात एकूण २२ लाख एक हजार ३२६ मतदार नोंदणी झाली आहे.
निरंतर मतदार नोंदणी सुरू आहे. त्यासाठी जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. निवडणूक नामनिर्देशन दाखल होईपर्यंत ज्या ज्या मतदारांची नावे नोंदविली जातील त्यांची स्वतंत्र पुरवणी यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी व मतदार यादी अचूक व शुध्दीकरण करण्यासाठी आपले अनमोल सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

गेल्या वेळच्या यादीनुसार या पुनरिक्षण कार्यक्र मानंतर जिल्ह्यात २१ हजार १६ पुरु ष मतदार व २४ हजार ८७२ स्त्री मतदारांची वाढ झालेली आहे. एका तृतीयपंथी मतदाराची वगळणी झालेली आहे. अशी एकूण ४५ हजार ८८७ मतदारांची वाढ झाली आहे.

फोटो असलेले ९५.२९टक्के मतदार
या अंतिम मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यात मतदार यादी फोटो असलेले एकूण २० लाख ९६ हजार ५९९ मतदार आहेत. त्याची टक्केवारी ९५.२९ आहे.
तसेच मतदार ओळखपत्र असलेले एकूण २१ लाख १३ हजार ६२३ मतदार आहेत. त्याची टक्केवारी ९६.०६ आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीतील महिला मतदारांचे प्रमाण हे एक हजार पुरु ष मतदारांमागे ९६५ आहे.
 

Web Title: Raigad district has the right to increase the number of voters, 22 lakhs 1 thousand 326 voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.