शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

रायगड जिल्ह्यामध्ये मतदारांच्या संख्येत वाढ, २२ लाख १ हजार ३२६ मतदार बजावणार हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 3:48 AM

आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण २२ लाख एक हजार ३२६ मतदारांची नोंदणी झाली आहे. हे मतदार येत्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

अलिबाग : आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण २२ लाख एक हजार ३२६ मतदारांची नोंदणी झाली आहे. हे मतदार येत्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी रोजी रायगड जिल्ह्याची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन हजार ६९३ मतदान केंद्रांवर तसेच मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरही मतदार यादी पाहता येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिध्द झालेल्या प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात १० लाख ९८ हजार ७२७पुरु ष मतदार, तर १० लाख ५५ हजार ६४१ महिला मतदार आणि चार अन्य मतदार होते. त्यानंतर राबविण्यात आलेल्या पुनरिक्षण कार्यक्र मात जिल्ह्यात मतदार नोंदणी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर करण्यात आली. त्यात नवीन नाव नोंदणी, नाव वगळणी, पत्ता बदल आदी पुनरिक्षण करण्यात आले. त्यानंतर ३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यात ११ लाख १९ हजार ७४३ पुरु ष मतदार, १० लाख ८० हजार ५१३ महिला मतदार व अन्य तीन मतदार असे एकूण २२ लाख २५९ मतदार नोंदविण्यात आले. तसेच १०५७ सर्व्हिस मतदार व १० एनआरआय मतदार यांचा समावेश करून जिल्ह्यात एकूण २२ लाख एक हजार ३२६ मतदार नोंदणी झाली आहे.निरंतर मतदार नोंदणी सुरू आहे. त्यासाठी जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. निवडणूक नामनिर्देशन दाखल होईपर्यंत ज्या ज्या मतदारांची नावे नोंदविली जातील त्यांची स्वतंत्र पुरवणी यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांनी दिली.रायगड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी व मतदार यादी अचूक व शुध्दीकरण करण्यासाठी आपले अनमोल सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.गेल्या वेळच्या यादीनुसार या पुनरिक्षण कार्यक्र मानंतर जिल्ह्यात २१ हजार १६ पुरु ष मतदार व २४ हजार ८७२ स्त्री मतदारांची वाढ झालेली आहे. एका तृतीयपंथी मतदाराची वगळणी झालेली आहे. अशी एकूण ४५ हजार ८८७ मतदारांची वाढ झाली आहे.फोटो असलेले ९५.२९टक्के मतदारया अंतिम मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यात मतदार यादी फोटो असलेले एकूण २० लाख ९६ हजार ५९९ मतदार आहेत. त्याची टक्केवारी ९५.२९ आहे.तसेच मतदार ओळखपत्र असलेले एकूण २१ लाख १३ हजार ६२३ मतदार आहेत. त्याची टक्केवारी ९६.०६ आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीतील महिला मतदारांचे प्रमाण हे एक हजार पुरु ष मतदारांमागे ९६५ आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकRaigadरायगड