सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड जिल्हा पोलीस दल पुन्हा अव्वल

By निखिल म्हात्रे | Published: September 2, 2022 05:26 PM2022-09-02T17:26:49+5:302022-09-02T17:27:52+5:30

दरमहा पोलीसांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो.

Raigad District Police Force tops again in CCTNS performance | सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड जिल्हा पोलीस दल पुन्हा अव्वल

सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड जिल्हा पोलीस दल पुन्हा अव्वल

googlenewsNext

अलिबाग -  सीपीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये रायगडपोलिस विभागाने राज्यात पुन्हा एकदा कामाच्या तत्परतेने सरशी सिध्द केली आहे. जुलै २०२२ मध्ये पुन्हा एकदा २३२ गुणांपैकी २२५ गुण प्राप्त करून १७ टक्के गुणांसह राज्याच्या गुणांकनात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. दरमहा पोलीसांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो. मागिल काही महिन्यात रायगड जिल्ला सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करीत दरमहा प्रथम पाच मध्ये स्थान प्राप्त केले होते. नंतर सीसीटीएनएम कामकाजामध्ये आणणी सुधारणा करीत मे २०२२ मध्ये प्रथम क्रमांक, जुन २०२२ मध्ये तृतीय क्रमांक व आता जुलै २००२ मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत पुन्हा एकदा रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

पोलीस अधीक्षक रायगड अशोक दुध व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्थापीत सीसीटीएनएस कक्ष व पोलीस ठाण्यात नियुक्त प्रशिक्षीत पोलीस अंमललदार यांनी ही प्रशंसनिय कामगिरी केली आहे. रायगड जिल्हयाने पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे अहवाल यांची सीसीटीएनएस मधील फॉर्मची सिटीझन पोर्टल वरील प्राप्त तक्ररी तात्काळ निर्गती,  सीसीटीएनएस प्रणालीचा वापर करून करण्यात येणार गुन्हे प्रकटीकरण, प्रतिबंधक कारवाई यामध्ये विशेष कामकात यश प्राप्त केले आहे. पोलीस ठाण्यात अटक होणा-या गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात हि प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत असून यातील सातत्य कायम ठेवत यापुढेही रायगड जिल्हा अग्रस्थानी ठेवण्याकरीता आम्ही प्रयत्नशील असु असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अशोक दुध यांनी केले आहे.

Web Title: Raigad District Police Force tops again in CCTNS performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.