अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १ ते २२ मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या दहावी एसएससी परीक्षेच्या शनिवारी आॅनलाइन जाहीर झालेल्या निकालानुसार रायगड जिल्ह्याचा निकाल ७६.७८ टक्के लागला आहे. यंदा मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ८२.३४ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण प्रमाण ७१.४३ टक्के असल्याने यंदादेखील निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यात माणगाव तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे ८०.४१ टक्के तर सर्वात कमी मरुड तालुक्याचा ६२.०४ टक्के लागला आहे.एकूण २८ हजार ९७३ परीक्षार्थी उत्तीर्ण
रायगड जिल्ह्यातील ५४४ शाळांतील दहावी एसएससीच्या नव्या अभ्यासक्रमाप्रमाणे यंदा २० हजार ४२३ मुले, तर १७ हजार ६३९ मुली असे एकूण ३८ हजार ०६२ परीक्षार्थी होते. त्या पैकी २० हजार २२१ मुले तर १७ हजार ५१५ मुली, अशा एकूण ३७ हजार ७३६ परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. या पैकी ७१.९६ टक्के म्हणजे १४ हजार ५५१ मुले तर ८२.३४ टक्के मुली म्हणजे १४ हजार ४२२ मुली असे एकूण ७६.७८ टक्के म्हणजे २८ हजार ९७३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.गुणवत्ता श्रेणीत ४,६९५ विद्यार्थी२८ हजार ९७३ उत्तीर्ण परीक्षार्थींपैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ४ हजार ६९५, प्रथम श्रेणीत ९ हजार ८०४, द्वितीय श्रेणीत १० हजार ७३१ तर उत्तीर्ण श्रेणीत ३ हजार ७४३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.दहावी एसएससीच्या जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षार्थींचा निकाल ३६.३६ टक्के लागला आहे. या अभ्यासक्रमाचे ३१२ शाळांमधील १०९० मुले तर ३७१ मुली, असे एकूण १४६१ परीक्षार्थी होते. त्यापैकी १ हजार ४३० परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी प्रथम श्रेणीत दोन आणि उत्तीर्ण श्रेणीत ५१८ असे एकूण ३६.३६ टक्के म्हणजे ५२० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.सुधागडचा निकाल ६९ टक्केपाली व जांभूळपाडा या दोन केंद्रावर परीक्षेसाठी ९१० विद्यार्थ्यांपैकी ८८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात ६१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ५६ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी तर १९० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. तालुक्यातील पाली येथील ग. बा. वंडर हायस्कूलचा ७४. ०९ टक्के, आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा विद्यालयातील ६८.३५ टक्के, स्वामी विवेकानंद विद्यालय मजरे जांभूळपाडा ७९.१६ टक्के, वावळोली एकलव्य आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा ४१.७७ टक्के, शारदा विद्यामंदिर पेडली ६१.११ टक्के, नांदगाव येथील संत नामदेव विद्यालय ८७.२३ टक्के, जागृती हायस्कूल नाडसूर ८७.८७ टक्के, डॉ. प्रभाकर आर. गावंड विद्यालय ७८.३७ टक्के, माध्यमिक विद्यालय खवली ६८.१८ टक्के, माध्यमिक विद्यालय चंदरगाव ६०.८६ टक्के, प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक विद्यालय ५४.२८ टक्के, कोंडजाई हायस्कूल नागशेत ५० टक्के, माध्यमिक विद्यालय वाघोशी ५७.१४ टक्के, माध्यमिक विद्यालय पाच्छापूर ६२.९६ टक्के, श्री बल्लाळ विनायक माध्यमिक प्रशाला ७३.९१ टक्के, पाली येथील टॉप वर्थ इंग्लिश स्कूल ९१.१७ टक्के, चिवे आश्रमशाळा ५७.५० टक्के, पडसरे आश्रमशाळा ७८.०४ टक्के आणि घोटावडे येथील राज एज्युकेशन सेंटर शाळा निकाल ९५.८३ टक्के इतका लागला आहे.पेणचा निकाल ७७.१५ टक्केच्पेण तालुक्याचा दहावीचा निकाल ७७.१५ टक्के लागला आहे. पेण तालुक्यातून एकूण २४४३ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेस २४३४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १८७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ३३८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले असून, ५८२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ६९२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण, २६६ फक्त उत्तीर्ण झाले आहेत.च्तालुक्यातील तीन विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला असून यात कारमेल इंग्लिश मीडियम स्कूल, पी.एस.एम.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, सुमतीबाई देव माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे.दहावी एसएससी नवा अभ्यासक्रम : तालुकानिहाय निकालमाणगाव ८०.४१पनवेल ८०.२६अलिबाग ७९.३१महाड ७८.८७रोहा ७७.३७पोलादपूर ७७.०२पेण ७६.६३खालापूर ७५.१७उरण ७३.८०तळा ७३.०३कर्जत ७२.९५सुधागड ६९.४३श्रीवर्धन ६८.९१म्हसळा ६८.१६मुरुड ६२.०४प्रिआ स्कूलची १०० टक्क्यांची परंपरारसायनीतील प्रिआ स्कूलचे सर्व विद्यार्थी दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने २७ वर्षे या शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या परीक्षेत १२५ विद्यार्थी बसले होते.